सोलापूर : पुढच्या 50 वर्षात येणाऱ्या संभाव्य भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन पंढरपूर शहराच्या विकास आराखड्याला आता वेग आला आहे. कॉरिडॉरच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सलग तीन दिवस बाधित नागरिक व्यापारी आणि वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी यांच्याशी चर्चा केली आहे. या तीन दिवसात बाधित नागरिकांची कॉरिडॉरबाबत असलेली भूमिका शासनाकडून असलेली अपेक्षा यावर सविस्तर चर्चा झाली आहे. बहुतांश नागरिकांतून याला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. 

Continues below advertisement

चौफाळा ते महाद्वार घाट या ठिकाणी 100 मीटर रुंदीचा कॉरिडॉर बनवला जाणार

आज जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसांच्या मॅरेथॉन बैठकांबाबत माध्यमांशी संवाद साधताना नागरिकांच्या अपेक्षा नुसार एक पॅकेज बनविण्याचे काम आता सुरू होणार आहे. सर्वांनी याला होकार दिल्यानंतर ते शासनाकडे सादर केले जाईल असे कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. वास्तविक विठ्ठलाच्या दर्शनाला दिवसेंदिवस होणारी गर्दी कमालीची वाढू लागली असून अगदी शनिवार-रविवारी च्या सुट्ट्यात देखील हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत असतात. सर्वसाधारणपणे दोन ते अडीच कोटी एवढे भाविक सध्या वर्षाला पंढरपुरात येत असल्याचा अंदाज आहे. यामुळं मंदिर परिसर व इतर ठिकाणी खूप गर्दीचे चित्र वारंवार समोर येत असते. अशा गर्दीतून शेंद्राचींगरी किंवा इतर दुर्घटना भविष्यात घडू नयेत यासाठी अशा पद्धतीचा विकास आराखडा राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशीर्वाद यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी या कामाला सुरुवात केली असून सध्या चौफाळा ते महाद्वार घाट या ठिकाणी 100 मीटर रुंदीचा कॉरिडॉर बनविला जाणार आहे. या संदर्भातच जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवस बाधित नागरिकांशी चर्चा केली आहे. 

बुधवारपासून विद्यार्थ्यांच्या मार्फत सर्वेक्षण सुरु होणार

येत्या बुधवारपासून विद्यार्थ्यांच्या मार्फत या बाधित नागरिक व्यापारी यांचे सर्वेक्षण सुरू होणार असून त्यांच्या मार्फत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावलीची उत्तरे सर्व बाधितांनी द्यावीत असे आव्हान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. यातूनच नागरिकांच्या अपेक्षा आणि मागणीनुसार चांगली पॅकेज बनविणे सोपे जाईल असे आशीर्वाद यांनी सांगितले. कॉरिडॉरच्या बाबतीत लोकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित नागरिकांना दिला आहे. या पॅकेजनंतर नागरिकांशी शेवटची चर्चा होऊन यानंतर भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होईल. सध्या तरी नागरिकांतून चांगल्या पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शासनाकडून नेमकी किती आर्थिक मदत मिळणार आणि कशा रीतीने पुनर्वसन होणार याकडे बाधित नागरिकांचे लक्ष आहे. याबाबत सकारात्मक भूमिका शासनाकडून आल्यास या कॉरिडॉरमुळे  पुढच्या पन्नास वर्षात होणाऱ्या भाविकांच्या संख्येलाही येथे अडचण होणार नाही.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Pandharpur : आषाढी वारीचं व्यवस्थापन आता AI च्या माध्यमातून, पंढरपुरात यशस्वी चाचणी