Palghar Tarapur MIDC : पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसीतील (Palghar Tarapur MIDC) कारखान्यात पुन्हा एकदा वायुगळती झाली आहे. बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ 13 मधील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड या कंपनीत वायुगळती झाली आहे. या वायुगळतीमुळं आठ कामगारांना बाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान जखमी कामगारांवर बोईसरमधील शिंदे या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने कामगारांना जीव गमवावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मृतांची नावे
1. कल्पेश राऊत 2. बंगाली ठाकूर 3. धीरज प्रजापती 4. कमलेश यादव
जखमींची नावे
1.रोहन शिंदे 2. निलेश हाडळ
दरम्यान, आज दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान बोईसर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर 13 ता. जिल्हा पालघर येथील मेडली फार्मा या कंपनीत मध्ये नायट्रोजन रिएक्शन टॅंक मध्ये गॅस गळती झाल्याने अपघात घडला. त्यात सहा व्यक्ती बाधित झाले. त्यांना शिंदे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. त्यातील चार व्यक्ती मृत झाले आहेत. तर दोघांची परिस्थिती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) मध्ये भरती करण्यात आलेले आहे त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
या कारखान्यात 36 कामगार काम करतात
या कारखान्यात 36 कामगार काम करत असताना ची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीस देशमुख यांनी दिली असून यापैकी पाच कामगार हे उत्पादन सुरू असताना त्या ठिकाणी काम करत होते त्यापैकी चार जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला असून तर दोन कामगार अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. नेमकी ही वायू गळती कशामुळे झाली याचा तपास पुढे सुरू करण्यात आला असून याविषयी योग्य ती कारवाई केली जाईल असं पालघरचे पोलीस अधीक्षक यतीस देशमुख यांनी सांगितलं आहे. तर सातत्याने या औद्योगिक कार्यक्षेत्रातील कारखान्यांमध्ये असे प्रकार घडत असून कुठेतरी कारखाना व्यवस्थापन कडून दुर्लक्ष होत होत असून सुरक्षा विभाग ही झोपेत असल्याचा आरोप आमदार राजेंद्र गावित यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
पालघरमधील तारापूर एमआयडीसीत वायुगळती; तीन कामगारांचा मृत्यू