(Source: Poll of Polls)
पालघरमध्ये खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! दुचाकीवरुन पडून महिलेचा मृत्यू, दुसरी महिला गंभीर जखमी
पालघर-मनोर-विक्रमगड-जव्हार महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांनी जीव घेतला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नावझे गावातील 47 वर्षीय अनिता अनिल पाटील या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Palghar News : पालघर-मनोर-विक्रमगड-जव्हार महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांनी जीव घेतला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नावझे गावातील 47 वर्षीय अनिता अनिल पाटील या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना पालघरजवळील चहाडे नाका परिसरातील सज्जनपाडा येथे घडली आहे. अनिल पाटील आणि त्यांची पत्नी अनिता हे दोघेही मोटरसायकलवरून पालघरहून घरी जात असताना रस्त्यावर असलेल्या खोल खड्ड्यात मोटरसायकल आदळली. या धडकेनंतर अनिता पाटील खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, सहादिवस उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू
जखमी अवस्थेत अनिता पाटील यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र सहा दिवस उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याच महामार्गावर मासवनजवळ समृद्धी संतोष पाटील ह्या देखील खड्ड्यामुळे मोटरसायकलवरून पडून गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी तब्बल 12 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले असतानाही प्रत्यक्षात रस्त्यावरील खड्डे मात्र कायम असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे. पालघरहून घरी जात असताना रस्त्यावर असलेल्या खोल खड्ड्यात मोटरसायकल आदळली. या धडकेनंतर अनिता पाटील खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा दिवस या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु होते, अखेर या महिलेचाउपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे.
रस्त्यावरील खड्डे नेमके कोण भरून काढणार?
नागरिकांनी कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर निधी हडपल्याचा आरोप करत सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कुणबी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून, ठोस कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्डे नेमके कोण भरून काढणार? आणि अशा निष्पाप बळींचं मोल कोण देणार? असा सवाल संतप्त नागरिकांनी प्रशासन आणि शासनाला विचारला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्यावरुन नागरिक दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर दोन ट्रकांमध्ये भीषण अपघात; ट्रक चालकसह क्लिनरचा जागीच मृत्यू; शहापूरमधील घटना




















