एक्स्प्लोर

वसई विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण! शिक्षण विभागाची मोठी कारवाई, तीन अधिकाऱ्यांना केलं निलंबित

वसईच्या सातीवली येथील श्री हनुमान विद्या मंदिर शाळेत एका शिक्षिकेने शिक्षा म्हणून दिलेल्या उठाबशांमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंचर शिक्षण विभागानं मोठी कारवाई केली आहे.

Palghar : वसईच्या सातीवली येथील श्री हनुमान विद्या मंदिर शाळेत एका शिक्षिकेने शिक्षा म्हणून दिलेल्या उठाबशांमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तीन शिक्षण अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. 

या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली 

शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यींनीला उठाबशा काढायची शिक्षा दिली होती. त्यानंतर विद्यार्थिनी काजल उर्फ  अंशिका गौड हिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. या घटनेची माहिती वरिष्ठांना न देणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे आणि अनधिकृत शाळांवर कारवाई न करणे याबद्दल वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे,  वसई पंचायत समिती  शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र उबाळे आणि वालीव केंद्रप्रमुख कैलास चव्हाण  या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि वेळेत माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई

सातीवली परिसरात अनधिकृतपणे वर्ग चालत असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. तरीही शिक्षण विभागाकडून योग्य ती कारवाई न झाल्याने नागरिकांनी वारंवार यावर  प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि वेळेत माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर पाऊल उचलत प्रशासनाने दाखवून दिले आहे की अशा निष्काळजीपणाला कोणतीही मुभा दिली जाणार नाही.

नेमकं प्रकरण काय?

शाळेमध्ये पोहचण्यासाठी दहा मिनिटे उशीर झाल्याचा राग शिक्षिकेला आला. राग अनावर न झालेल्या शिक्षिकेने विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढण्याची भयावह शिक्षा ठोठावली. या जीवापेक्षा मोठ्या शिक्षेमुळे विद्यार्थीनीची तब्येतच बिघडली व तिला रुग्णालयात दाखल कराव लागलं, पण दुर्देवाने उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. ही संतापजनक घटना वसई पश्चिममधील सातीवली परिसरातल्या श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये घडली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलीच्या पालकांनी केली होती. पोलिसांनी शाळेत व रुग्णालयात जाऊन याप्रकरणी अधिक चौकशी केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाळेला भेट दिली. मात्र, शनिवार असल्याने कोणीही भेटले नाही. शाळेतील दोन शिक्षिका भेटल्या. मात्र, कोणतेही रेकॉर्ड बघायला मिळाले नाही तसेच कुठलीही माहिती मिळाली नाही. दरम्यान, या प्रकरणी शिक्षण विभागानं आता मोटी कारवाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget