Palghar News Updates: पालघर जिल्यातील वाडा तालुक्यातील जवळच असलेल्या ऐनशेत या गावातील परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा होत आहे. ऐनशेत व पेठरांजणी गावातील काही नागरिकांनी स्वतः बिबट्या पाहिल्याचे सांगितल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने वनविभागाला कळविण्यात आले होते.
वनविभागाने शनिवारी रात्री डहाणू येथील भरारी पथकाला देखील पाचारण केले होते.या पथकाला बिबटया सदृश्य आकृती लक्षात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले व त्यासाठीच गावातील विविध भागांमध्ये सध्या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये काल पहाटे बिबट्या कैद झाल्याचे तसेच रात्री बिबट्याने एका पाळीव कोंबड्याची शिकार केल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बिबट्याने सुदैवाने कोणतीही हानी केली नसली तरी ग्रामस्थांनी सतर्क राहावे असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच या शिकारी दरम्यान या कोंबड्यांची पिसे ही रस्त्याच्या कडेला आढळून आल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान बिबट्याचा वावर हा ऐनशेत-पेठरांजणी लोकवस्ती परिसरात असल्याने तसेच काही नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिल्याने व आता वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याने ऐनशेत-पेठरांजणी व परिसरात बिबट्याची दहशत तयार झाली आहे. वनविभागाकडून आजूबाजूच्या परिसरात बिबट्याच्या काही खुणा दिसतात का याचा तपास करण्यात येत असून लोकवस्ती परिसरात वावरणाऱ्या बिबट्यापासून बचावासाठी वनविभागाकडून काय कारवाई होतेय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यांन नागरिकांनी दक्ष आणि सावधान राहण्याचे आवाहन परिक्षेत्र अधिकारी विकास लेंडे यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील वाल्हे परिसरात बिबट्याचे दर्शन
पुरंदर तालुक्यातील वाल्हे परिसरातील वाल्हे-परिंचे रस्त्यावर गेल्या आठवड्यात रात्री बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात पहिल्यांदाच बिबट्याचं दर्शन झाल्याने, स्थानिकांसह शेतकऱ्यां मध्ये भीती निर्माण झालीय. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या तरुणांनी या बिबट्याचा व्हिडिओ मोबाईल मध्ये काढला आहे.
ही बातमी देखील वाचा