पालघर : इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने मोठी कामगिरी केल्याची घटना घडली आहे. परप्लेक्सिटी (एआय) या कंपनीत तांत्रिक बिघाड झाला होता. हा बिघाड सोडवून देण्याचे आवाहन कंपनीने तरुणांना केले होते. त्याला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने प्रतिसाद देत हा तांत्रिक बिघाड सोडवला आहे. त्याची बुद्धिमत्ता आणि कौशल्य यांमुळे प्रभावित झालेल्या परप्लेक्सिटी या एआय कंपनीने लगेचच त्याला तब्बल 1 कोटी 6 लाखांचे वार्षिक पॅकेजची नोकरी दिली आहे. जितेंद्र प्रजापती (Jitendra Prajapati)  असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. 

Continues below advertisement


अशा प्रकारे निवड झालेला जितेंद्र हा पालघर जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी


इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या जितेंद्र प्रजापती (Jitendra Prajapati) या विद्यार्थ्याने मोठी कामगिरी केली आहे. परप्लेक्सिटी (एआय) या कंपनीत झालेला तांत्रिक बिघाड सोडवण्याचं काम या विद्यार्थ्याने केले आहे. या बदल्यात त्याला कंपनीने 1 कोटी 6 लाख रुपयांची पगार असणारी नोकरी दिली आहे. वसईच्या विद्यावर्धिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातीलयात जितेंद्र प्रजापती हा शिक्षण घेत आहे.  या विद्यार्थ्याला परप्लेक्सिटी एआय कंपनीने गलेलठ्ठ पगाराची नोकरी देत त्याची सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदासाठी निवड केली आहे. अशा प्रकारे निवड झालेला जितेंद्र हा पालघर जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी ठरल्याचा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला आहे. जितेंद्र प्रजापती (21) हा भाईंदरमध्ये राहतो. तो वसईत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. सध्या तो संगणक शाखेच्या अंतिम वर्षाला आहे.


जितेंद्रचे काम संपूर्ण महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी


जितेंद्रने त्याचे कौशल्य आणि ज्ञान वापरुन परप्लेक्सिटी (एआय) या कंपनीत झालेला तांत्रिक बिघाड सोडवण्याचं काम केलं आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या जितेंद्र प्रजापती याची कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी निवड झाली आहे. जितेंद्रची झालेली निवड ही संपूर्ण महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे. अशा प्रतिष्ठित कंपनीतून मिळणारे हे दरवर्षीचे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेज म्हणजे जितेंद्र यांच्या कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्याच्या कौशल्याची पावती आहे. जितेंद्र प्रजापती याच्यासारखे चांगले कौशल्य आणि ज्ञान असणारे अनेक विद्यार्थी आहेत. फक्त त्यांच्या बुद्धीमत्तेला योग्य प्रकारचा न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Navdurga 2025 : आयटीच्या चमकत्या करिअरमधून ‘ज्यूस फार्म’कडे उड्डाण; स्नेहल हसबे यांचा यशस्वी प्रवास, शेतीतील नवदुर्गेची कहाणी