एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack :  राज्यातील 6 पर्यटकांचे मृतदेह आज मुंबईत आणणार, शिवसेनेची टीम समन्वयासाठी श्रीनगरमध्ये दाखल   

जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह आज मुंबईत (Mumbai) आणण्यात येणार आहेत.

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह आज मुंबईत (Mumbai) आणण्यात येणार आहेत. शिवसेनेची टीम समन्वयासाठी श्रीनगरमध्ये दाखल झाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील, योगेश कदम मुंबई विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतः सर्व यंत्रणासोबत समन्वय साधत आहेत.  

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे पार्थिव आणि नातेवाईकांना पुन्हा राज्यात आणण्याची प्रक्रिया सरकारच्या वतीने सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः यासंदर्भात बारकाईने आढावा घेत असून मार्गदर्शन करत आहेत. श्रीनगर येथे या पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना विमानात बसवून देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच श्रीनगरमध्ये पोहोचली आहे. तर मुंबईत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत. 

पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम अद्यापही श्रीनगरमध्ये तळ ठोकून 

दरम्यान, श्रीनगरमध्ये अडकलेल्या इतर पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम अद्यापही श्रीनगरमध्ये तळ ठोकून आहे. या घटनेतील संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर-मुंबई एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. हे विमान आज दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी मुंबईला निघेल. तर पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव संध्याकाळी 6 वाजता निघणाऱ्या विमानाने पुण्यात आणले जाईल. तर डोंबिवलीचे रहिवासी असलेल्या हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान 1 वाजून 15 मिनिटांनी निघून मुंबईला पोहोचेल.

दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय.  तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: या चेहऱ्यांना कधी विसरू नका! पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचे फोटो समोर

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur ZP and Panchayat Samiti Result: कोलहापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
कोलहापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Sharad Pawar: शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur ZP and Panchayat Samiti Result: कोलहापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
कोलहापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Sharad Pawar: शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Ahilyanagar Crime News: तू माझ्याशी का बोलत नाहीस? नंबर का ब्लॉक केला? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला; अहिल्यानगर हादरलं!
तू माझ्याशी का बोलत नाहीस? नंबर का ब्लॉक केला? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला; अहिल्यानगर हादरलं!
Solapur : सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल: ZP च्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांवर कोणाची बाजी?
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल: ZP च्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांवर कोणाची बाजी?
Kolhapur ZP election: कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
Sangli ZP Election Result : सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Embed widget