मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून त्यात महाराष्ट्रातील 10 व्यक्तींना गौरवण्यात आलं आहे. त्यामध्ये ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 


ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, सोनू निगम, विजयकुमार डोंगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. देशभरातून एकूण 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. 


महाराष्ट्रातील या व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. 


पद्मविभूषण



  • प्रभा अत्रे - कला

  • राधेशाम खेमका (मरणोत्तर)

  • बिपीन रावत (मरणोत्तर)

  • कल्याण सिंग (मरणोत्तर)


पद्मभूषण



  • सायरस पुनावाला- औषध निर्मिती

  • नटराजन चंद्रशेखरन- व्यापार आणि उद्योग


पद्मश्री



  • विजयकुमार डोंगरे- औषध निर्मिती

  • हिमंतराव बावसकर- औषध निर्मिती

  • सुलोचना चव्हाण- कला

  • सोनू निगम- कला

  • अनिल राजवंशी- विज्ञान आणि अभियांत्रिकी

  • बालाजी तांबे (मरणोत्तर)- औषध निर्मिती

  • भिमसेन सिंगल- औषध निर्मिती


चार भारतीय वंशाच्या व्यक्तींना पुरस्कार
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचसोबत ब्रिटनचे नागरिक परंतु भारतीय वंशाच्या डॉ. प्रोकर दासगुप्ता आणि आयर्लंडच्या रुतगेर कॉर्टनहस्ट यांचाही पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.  


पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पुरस्कार आहेत. या पुरस्काराची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून केली जाते. दरवर्षी मार्च वा एप्रिल या महिन्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यात राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र (सनद) तसेच एक पदक यांचा समावेश असतो. 


महत्त्वाची बातम्या :