Gopichand Padalkar: एका टँकरचे तीन टँकर करून गब्बर झाले; गोपीचंद पडळकरांकडून डेमो दाखवत दूध भेसळीचा आरोप
Gopichand Padalkar: ही भेसळ थांबली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे अशी मागणी पडळकर यांनी केली. ही लोक एका टँकरचे तीन तीन टँकर करत असल्याचा आरोप सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केला.

Gopichand Padalkar: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व दूध भेसळीचा डेमो दाखवत दुधामध्ये भेसळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. डेअरीवाल्यांकडून एका टँकरचे तीन टँकर करण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी डेमो दाखवत केला. यावेळी दुधामध्ये वेगवेगळ्या केमिकलची आणि तेलाची भेसळ करून आरोग्याशी खेळ होत असल्याचे म्हणत त्यांनी यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली. आज (11 जून) भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी एकत्रित दूध भेसळीवरून हल्लाबोल केला.
ही भेसळ थांबली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे
यावेळी गोपीनाथ पडळकर यांनी डेमो दाखवत दुधामध्ये कोणत्या पद्धतीने भेसळ केली जाते हे दाखवले. यावेळी दुधामध्ये वेगवेगळे प्रकारचे केमिकल आणि तेल घालून ते मिक्स करून दूध भेसळ केली जात असल्याकडे लक्ष वेधले. या दूध भेसळीमधून शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत लागत नसून डेअरीवाले गब्बर होत असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटल आहे. ते म्हणाले की, मुंबई, पुणे, नागपूरमध्ये जी लोक राहत आहेत त्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. यामुळे कॅन्सरसारखे आजार वाढत आहेत. त्यामुळे भेसळ थांबली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. मुंबईत म्हशीचे जे गोठे आहेत त्या गोट्यांमध्ये इतरांना जाऊ दिलं जात नाही, त्यांना बाहेर दूध दिले जाते असा सुद्धा आरोप पडळकर यांनी केला. ही भेसळ थांबली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे अशी मागणी पडळकर यांनी केली. ही लोक एका टँकरचे तीन तीन टँकर करत असल्याचा आरोप सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केला.
मी याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देणार
गोपीचंद पडळकर म्हणाले की हे मटेरियल मी इस्लामपुरातून आणलं आहे. 50-50 हजार लिटर कलेक्शन होत आहे. मात्र, अधिकाऱ्यांना तिथं जाता येत नाही. अशांचे टँकर चेक करण्याची मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पैसे गेले आणि डेअरीतून किती रक्कम मिळाली यामधून सर्व माहिती मिळेल. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देणार असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या

























