Omraje Nimbalkar :  अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला नाही, अशी माहिती कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली होती. अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती; परंतु महाराष्ट्र सरकारने केंद्राला एक लाख 10 हजार 309 हेक्टर शेती नष्ट झाल्याचे सांगितले आहे. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?

आधी गृहमंत्रालयाने कृषी मंत्रालयाने लिहून दिलं की अजून प्रस्ताव आलेला नाही. तुमच्या माध्यमातून बातम्या झाल्यानंतर कृषीमंत्री म्हणाले की राज्यकडून प्रस्ताव आलेला आहे. सर्वोच्च सभागृहात त्यांनी असं म्हटलं आहे. हे खासदारांच्या विशेषाधिकारात येतं, त्यामुळं लोकसभा अध्यक्षाकडे दाद मागणार आहे.  मंत्री खोटं उत्तर देत असतील तर ते दुर्दैवी आहे. दुर्लक्ष झालं असेल तर कबूल करा ना. पण अशाप्रकारे राज्यातील सरकारला प्रोटेक्ट करत आहेत. आजपर्यंत कोणत्याही मंत्र्याने असं रेकॉर्डवर खोट उत्तर दिलेलं पाहिलं नाही असे ओमराजे म्हणाले. प्रस्ताव केंद्राकडे येत नाही तर डबल इंजिन चा काय उपयोग? असा टोला देखील ओमराजे निंबाळकर यांनी लगावला. 

मुख्यमंत्री फोनवरुन सभा घेत होते, उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून पळत पळत जातायेत

मुख्यमंत्री फोनवरुन सभा घेत होते, उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून पळत पळत जात सभा घेत आहेत. मी माझं कर्तव्य पार पाडलेलं आहे. उद्या किंवा परवा हक्कभंग दाखल करणार असल्याचे ओमराजे निंबाळकर म्हणाले.  लोकसभेत दिले जाणारी उत्तरे खोटे ठरवली जाणार असेल तर दुर्दैवी आहे.  

Continues below advertisement

खोटं बोल पण रेटून बोल अशी राणा जगजितसिंह पाटील यांची स्थिती

खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांची परिस्थिती असल्याचे म्हणत ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली. डबल इंजिन सरकारचा काय उपयोग होतो आहे. तुळजापूरमध्ये ज्याने ड्रग्स आणलं. त्याचे अकाउंट स्टेटमेंट आहेत. तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्रच्या नगराध्यक्ष पदाचा तिकीट भाजपने त्याला दिलं. ज्याला अब्रू नाही त्याने अब्रुनुकसान दावा काय करावा असेही ओमराजे म्हणाले.  

महत्वाच्या बातम्या:

Omraje Nimbalkar : अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारची अनास्था, केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडला; तर खासदार ओमराजे निंबाळकरांची सरकारवर सडकून टीका