मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी केल्याप्रकरणी भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजरिया यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या सायबर सेलनं जितेन गजरिया यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. जितेंन गजरिया यांनी रश्मी ठाकरेंबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गजरिया यांना नोटीस पाठवली आहे.


भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजरिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्वीट करताना  'महाराष्ट्राची राबडी देवी' असं आक्षेपार्ह लिखान केलं आहे. या ट्वीटवरुन आता सायबर पोलिसांनी जितेन गजरिया यांना नोटीस पाठवली असून त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. 


या ट्वीटसोबतच जितेन गजारिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधातही आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. आता या ट्वीटमागे आणि त्यामधील मजकूरामागे काय हेतू होता ही माहिती घेण्यासाठी सायबर पोलिसांनी जितेन गजारिया यांना नोटीस पाठवली असून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. 


जितेन गजारिया यांनी केलेली पोस्ट ही अत्यंत आक्षेपार्ह असून त्या विरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जितेन गजारिया हे या प्रकरणात जर दोषी आढळले तर त्यांना अटक होऊ शकते. 


महत्त्वाच्या बातम्या :