एक्स्प्लोर

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून हप्ते भरूनही वर्षापासून परतावा मिळेना; बँकांचे हप्ते फेडण्यासाठी मराठा समाजातील तरुण सावकाराच्या दारात

गेल्या वर्षभरापासून या योजनेतील लाभार्थ्यांना व्याजाचा परतावा वेळेवर मिळत नसल्याने राज्यभरातून मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. महामंडळाने सरकारकडे 400 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal: मराठा समाजातील तरुणांना हक्काचा रोजगार आणि उद्योजक बनवण्याचे स्वप्न दाखवून स्थापन झालेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सध्या निधीअभावी अडचणीत सापडले आहे. महामंडळाच्या माध्यमातून 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना सुरुवातीला अत्यंत यशस्वी ठरली. मात्र, गेल्या वर्षभरापासून या योजनेतील लाभार्थ्यांना व्याजाचा परतावा वेळेवर मिळत नसल्याने राज्यभरातून मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. सध्या महामंडळाने सरकारकडे 400 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. हा निधी मिळाल्यासच प्रलंबित व्याजाचा प्रश्न सुटू शकणार आहे. तोपर्यंत मात्र राज्यातील हजारो मराठा तरुण उद्योजक हप्त्यांच्या ओझ्याखाली दबले जात आहेत.

बँकेचा हप्ता फेडण्यासाठी तरुण सावकाराच्या दारात 

सरकारकडून व्याजाचा परतावा मिळत नसल्याने लाभार्थ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अनेक तरुण उद्योजकांनी आपला व्यवसाय टिकवण्यासाठी आणि योजनेतून बाद होऊ नये म्हणून बँकांचे हप्ते भरण्यासाठी चक्क सावकारांकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. या परिस्थितीवर बोलताना महामंडळाचे (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) माजी उपाध्यक्ष संजय पवार यांनी राज्य सरकारकडे तातडीने व्याजाचा परतावा करण्याची मागणी केली आहे. "अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेले हे महामंडळ सरकार बंद करण्याच्या विचारात आहे का?" अशी शंका आता उपस्थित होत आहे. दुसरीकडे, सरकारने लवकरात लवकर निधी न दिल्यास राज्यभर 'बोंब मारू' आंदोलन करण्याचा इशारा मराठा महासंघाचे वसंत मुळीक यांनी दिला आहे.

तपशील आकडेवारी
एकूण नोंदणीकृत अर्जदार 4 लाख 22 हजार
बँक कर्ज मंजूर लाभार्थी 1 लाख 80 हजार
वितरित केलेली कर्ज रक्कम 18 हजार 222 कोटी रुपये
आतापर्यंत झालेला व्याज परतावा 1,633 कोटी 51 लाख रुपये
महामंडळाची सरकारकडे नवीन मागणी 400 कोटी रुपये

तरुण आर्थिक कात्रीत सापडले 

नियमानुसार लाभार्थ्याने बँकेचे तीन हप्ते नियमित भरले की महामंडळ त्यावरील व्याजाचा परतावा लाभार्थ्याच्या खात्यात जमा करते. जर एक जरी हप्ता चुकला, तर लाभार्थी योजनेतून कायमचा बाद होतो. या भीतीपोटी मराठा तरुणांनी बँकांचे हप्ते वेळेवर भरले, पण आता सरकारने व्याजाचा परतावा रोखल्याने हे तरुण आर्थिक कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे लवकरात कर्जाचा परतावा सरकारकडून हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी तरुणांकडून केली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Nandurbar Bird Flu : नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक! केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडून पुन्हा पाहणी दौरा, तब्बल 4 लाख 4 हजार कोंबड्यांचे कलिंग
नंदुरबारच्या नवापूरमधील 9 पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक! केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडून पुन्हा पाहणी दौरा, तब्बल 4 लाख 4 हजार कोंबड्यांचे कलिंग
Ashok Kharat Crime News: चाकणकर भगिनींची चौकशी, 17 गुन्हे, 105 साक्षीदार अन् ED चा ससेमिरा; अशोक खरातच्या अटकेला 2 महिने पूर्ण, आतापर्यंत काय-काय घडलं?
चाकणकर भगिनींची चौकशी, 17 गुन्हे, 105 साक्षीदार अन् ED चा ससेमिरा; अशोक खरातच्या अटकेला 2 महिने पूर्ण, आतापर्यंत काय-काय घडलं?
Petrol and Diesel in Maharashtra: परभणी, बुलढाणा अन् वाशिममध्ये पेट्रोल-डिझेलची भीषण टंचाई, पंपावर ग्राहकांची तुफान हाणामारी; मनसेच्या पुण्यातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
परभणी, बुलढाणा अन् वाशिममध्ये पेट्रोल-डिझेलची भीषण टंचाई, पंपावर ग्राहकांची तुफान हाणामारी; मनसेच्या पुण्यातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
Ankita Walawalkar Cannes: 'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
Parth Pawar and Devendra Fadnavis: राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग , पार्थ पवार अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग , पार्थ पवार अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
Embed widget