Chandrashekhar Bawankule :  निधी वाटपाच्या मुद्यावरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्यावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. तसेच सामाजिक न्याय विभागासह आदिवासी कल्याणचा निधी देखील वळवल्याचं बोललं जात आहे. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा नेहमी त्या डिपार्टमेंटच्या नेत्यांना बोलून निधी वाटप करतात. ते नेहमीच मंत्र्यांना बोलवतात. अत्यंत कायदेशीर पध्तीने सांगतो, सामाजिक न्याय विभागाचा, आदिवासी कल्याण यांचा निधी राखीव आहे. तो कोणीही पळवू शकत नाही, असे बावनकुळे म्हणाले. त्याला कात्री लावता येत नाही. आदिवासी आणि सामाजिक निधीवर अन्याय करता येत नाही. देवेंद्र फडणवीस तसा अन्याय कधीही होऊ देणार नाहीत असे बावनकुळे म्हणाले. 

माझ्या मतदारसंघातील कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेच्या विस्तारीकरणाला परवानगी मिळाले आहे. 240 कोटींच्या प्रकल्पाच्या या कामाचं भूमीपूजन करणे आणि तातडीने काम सुरू करणे ह्या विकास कामांसाठी मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेतल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. सुलेखा ताई कुभांरे यांनी माझ्या मतदार संघात चांगला प्रकल्प राबविला आहे. आताच्या प्रकल्पामध्ये थीम पार्क आहे मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट आहे  240 कोटी राज्यशासनाने दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल असे शिरसाठ म्हणाले.  

प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांचे विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना विनती केली आहबे की मुंबईमध्ये बैठक लावू.  एसपी आणि कलेक्टरला मी पाठवले होते. वेगवेगळ्या विभागाचे बच्चू कडू यांनी प्रश्न मांडले आहेत. त्यांनी चुकीच्या पधतीने बोलू नये. आंदोलनाला बसलेल्या व्यक्तींची काळजी घेतो. मुख्यमंत्र्यांशी बोलून याबाबत तातडीने बैठक घेऊ असेही बावनकुळे म्हणाले. 

खाद्या ठिकाणी वाद निर्माण झाला तर मैत्रीपूर्ण लढू 

महापालिका निवडणुकींची सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाची आहे. काय प्रभाग रचना केली हे मला माहिती नाही. महारष्ट्र मधील संपूर्ण निवडणुका महायुती लढणार आहे. एखाद्या ठिकाणी वाद निर्माण झाला तर मैत्रीपूर्ण लढू असेही बावनकुळे म्हणाले.  मुख्यमंत्र्यांनी स्पष्ठता दिली आहे की, मतभेद मनभेद निर्माण करणारे वक्तव्य करु नये. तिघही सारखं काम करत आहोत. मुख्यमंत्री आमचा असला तरी तिहेरी समान आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Chandrashekhar Bawankule on Sudhakar Badgujar : मोठी बातमी: सुधाकर बडगुजर यांच्यासाठी भाजपने 24 तासांत दरवाजे उघडले? नाशिकमध्ये बावनकुळेंचं मोठं विधान