No mandatory face masks in Maharashtra? संपूर्ण जग गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीचा सामना करतोय. कोरोनाविरोधात लसीकरणालाही मोहिमही वेगात सुरु आहे. त्याबरोबरच मास्क वापरणं, हात स्वच्छ धुणं यांसारख्या नियमांचीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं जातंय. सध्या महाराष्ट्रात आलेले कोरोनाची तिसरी लाट ओसरताना दिसत आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क लावायचा नाही अशी चर्चा झाल्याची बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. परंतु, हे धादांत खोटं आहे. मास्क वापरलाच पाहिजे अशी राज्य सरकारची भुमिका आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे ग्रामविकास आणि कामगार मंत्री यांनी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय. यामुळं राज्यात मास्क न वापरण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचं म्हटलं होतं. मात्र, राज्याचे उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी हे वृत्त धादांत खोटं असल्याचं म्हटलंय. मंत्रिमंडळात मास्क न वापरण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. 


राजेश टोपे काय म्हणाले?
मास्क मुक्त महाराष्ट्र असं आम्ही कधीही म्हटलो नाही. आयसीएमआरनं निर्बंधाबाबत काही मार्गदर्शन करावं अशी आमची इच्छा नाही. तिसऱ्या लाटेचा उच्चांक आता येऊन गेला आहे. परंतु, काही जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढतीये त्यासंदर्भात काळजी घ्या. कोरोनाचा नवीन प्रकार अधिक प्रभावी आहे. मात्र, या प्रकाराचा रुग्ण अजून कुठेच आढळला नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.


महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या
महाराष्ट्रात शुक्रवारी 24 हजार 948 नव्या कोरोना रुग्णांची आणि 103 मृत्यूची नोंद झाली. याचबरोबर 45 हजार 648 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या 3 हजार 40 ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी 1 हजार 603 बरे झाले आहेत. महाराष्ट्रात 2 लाख 66 हजार 586 कोरोना आणि 1 हजार 437 ओमायक्रॉनचे रुग्ण सक्रीय आहेत. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha