मुंबई : राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंधरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीला गृहमंत्री, आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री असणार उपस्थित राहणार आहे. आज दुपारी चार वाजता बैठक घेण्यात येणार आहे.
बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद या पंधरा जिल्ह्याचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
जिल्हा | कालची रुग्ण संख्या | अॅक्टिव्ह रुग्ण |
बुलढाणा | 1146 | 5088 |
कोल्हापूर | 1069 | 14232 |
रत्नागिरी | 391 | 8082 |
सांगली | 1317 | 16923 |
यवतमाळ | 600 | 4204 |
अमरावती | 1473 | 10685 |
सिंधुदुर्ग | 296 | 3987 |
सोलापूर | 1597 | 19783 |
अकोला | 652 | 6430 |
सातारा | 1720 | 18942 |
वाशीम | 493 | 4085 |
बीड | 978 | 10463 |
गडचिरोली | 253 | 2057 |
अहमदनगर | 2236 | 18976 |
उस्मानाबाद | 728 | 6692 |
गुरुवारी राज्यात 47,371 रुग्ण बरे होऊन घरी तर 29,911 नवीन रुग्ण
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. काल 47,371 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29,911 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 50,26,308 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.43% एवढे झाले आहे. राज्यात आज 738 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.55% एवढा आहे.