काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते: नितीन गडकरी
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2016 10:14 PM (IST)
मुंबई: 'सत्ता असताना कधीही जातीचं भले न करणाऱ्या काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते.' अशा शब्दात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे. 'भाजपसाठी गरीब माणूस केंद्रबिंदू आहे आणि असा विषमतामुक्त समृद्ध देश निर्माण करायचा आहे. ज्यात कुणालाही आरक्षण मागायची वेळ येणार नाही.' असं सांगालयाही ते विसरले नाहीत. राज्य कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना गडकरींनी हे वक्तव्य केलं. 'सरकारची चांगली काम कार्यकर्त्यांनी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावं. विकास हेच विरोधकांना उत्तर आहे.' असंही सांगण्यास गडकरी विसरले नाही.