पिंपरी : आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा खिल्ली उडवत शिवसेनेवर टीका केली आहे. “हे सरकार गोंधळलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुट्टीवर गेले आहेत. 60 दिवसात काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना थकवलं आहे. त्यामुळेच ते तीन दिवस सुट्टीवर गेले आहेत” अशाप्रकारची थेट टीका नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

कॅबिनेटमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतात. शिवसनेचे मंत्री हे टेबलवरील पेन आणि फाईल उचण्याचे काम करत असून, कॅबिनेटमध्ये कारकून सारखे बसलेले असतात,” अशी  बोचरी टीका नितेश राणेंनी केली आहे. पुण्याच्या कामशेतमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केल आहे.



देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पण त्यांनी कधी सुट्टी घेतली, की नागपूरला सुट्टीवर गेले असं ऐकलं का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या सहा वर्षांपासून सेवा करत आहेत. मात्र ते गुजरातला आईकडे सुट्टीवर गेले असं ऐकलं का? पण हे मुख्यमंत्री 60 दिवसातच थकले असल्याचं नितेश राणे म्हणाले. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना हैराण केले आहे. त्यामुळे मध्ये कुठलही स्टॉप न घेता ते थेट महाबळेश्वरला गेले असल्याचही राणे म्हणाले.

शिवसेनेचे सरकार कुठे आहे? शिवसेनेचे मंत्री, नेते हे कारकूनासारखे कॅबिनेटमध्ये असतात. निर्णय घेणारे हे सर्व काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आहेत. बाकी, टेबलवरील पेन आणि फाईल उचलण्याचे काम शिवसेनेचे मंत्री करतात,” अशी टीका आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर केली.

Nitesh Rane | मातोश्रीवरुन आदेश देणं सोपं, आता उत्तरं द्यावी लागणार : नितेश राणे | ABP Majha