बंडखोरी करणारे वळवळतायेत, चुकून निवडून आले तर एकही रुपयाचा निधी देणार नाही, नितेश राणेंचा इशारा
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून, राजकीय नेत्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राजकीय नेते या काळात ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
Nitesh Rane : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून, राजकीय नेत्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राजकीय नेते या काळात ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार प्रतार सुरु आहे. अशातच मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. निधी पाहिजे असेल तर जिल्हाचा पालकमंत्री म्हणून कमळ आणि धनुष्यबाण यांनाच निधी देणार असल्याचे राणे म्हणाले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी आमच्यासारख्या विरोधकांना किती निधी दिला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कणकवली मतदारंसघात अडीच वर्षामध्ये एकही रुपया निधी दिला नाही. बंडखोरी करणारे वळवळत आहेत, नारायण राणेंचा शब्द पाळला नाही. ते चुकून निवडून आले तर एकही रुपया निधी देणार नाही असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये 100 टक्के महायुती उमेदवार निवडून येतील
राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये 100 टक्के महायुती उमेदवार निवडून येतील असे मंत्री नितेश राणे म्हणाले. महायुतीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करायचा आहे. जिल्ह्यातील एकतर्फी निवडणूक आहे. यावेळी महायुती झाली बरं झालं, नाहीतर नगरपरिषद मध्ये झालं तसं झालं असतं तर डोक्यावरचे केस गेले असते असेही राणे म्हणाले. कुडाळ मालवण मधील जनतेला 10 वर्षांनंतर विकास काय आहे हे दिसत आहे, आधीचा आमदार गायब होता, दिसत नव्हता अशी टीका देखील राणे यांनी ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांच्यावर केली.
विरोधकांनी कितीही टीका करु देत, आम्ही 25 जागा बिनविरोध केल्याचे नितेश राणे म्हणाले.
द्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे आम्हाला गुपचूप निधी देत होते
समोरची सगळी दुकाने बंद झाली असल्याने उद्या निधी मागायला आमच्याकडे यावं लागेल, असा टोला राणे यांनी विरोधी उमेदवारांना लगावला. लोकसभेला नारायण राणे, विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर, निलेश राणे आणि नितेश राणे यांना निवडून दिलं तसं जिल्हा परिषदेमध्येही नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला दया. आम्ही विकास करून दाखवतो असे नितेश राणे म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे आम्हाला गुपचूप निधी देत होते, म्हणून त्यांचे तेव्हाही आणि आताही मदत करत आहेत म्हणून त्यांचे आभार असे नितेश राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात रेकॉर्ड केला असून 25 उमेदवार बिनविरोध निवडून आले
27 वर्ष नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद राहिली असून यापुढे देखील महायुतीची जिल्हा परिषद असेल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात रेकॉर्ड केला असून 25 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आडाळी एमआयडीसीमध्ये दाओस म्हणून मोठे प्रकल्प करार केले आहेत. स्थानिकांना विश्वासात घेऊन गोल्फ मैदान आडाळी एमआयडीसीमध्ये आणणार असल्याचे राणे म्हणाले. एमआयडीसी मार्फत स्कील सेंटर उभारणार. जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांमध्ये शंका असेल, मात्र महायुतीच्या नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद येणार. सिंधुदुर्गात महायुती म्हणून काम चांगल असून त्याला कोणाची नजर लागू नये असे राणे म्हणाले.
Before You Go
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
महत्त्वाच्या बातम्या






















