Nilesh Rane on Maratha Reservation सिंधुदुर्ग : सरसकट आरक्षण कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं यावर सरकारने योग्य तो मार्ग काढायचा आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं, ही मागणी रास्त आहे. अनेक वर्षांपासून आम्ही देखील ही मागणी करत आलोय. मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे. ओबीसीचा कोटा वाढवून आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी आहे, हा टेक्निकल मुद्या आहे. ही प्रक्रिया असून कायद्याची प्रक्रिया आहे. घटनेच्या अधिकारातून या तरतूदी कराव्या लागणार आहेत. जे तज्ञ आहेत त्यांना यावर मार्ग काढावा लागेल. हा फक्त मराठ्यांचा प्रश्न नाही, तर देशातील इतर राज्यांमध्ये देखील अनेक जातीचे लोक थांबले आहेत. गुजरातमध्ये पटेल थांबलेत, राजस्थानमध्ये गुजर, हरियाणामध्ये जाट थांबले. त्यामुळे याचा कधी ना कधी आपल्याला विचार करावा लागेल. प्रत्येक राज्यात आपआपापल्या कोट्यासाठी थांबले आहेत. अजून किती वर्ष आपण त्यांना थांबवणार आहोत? याचा विचार राज्य आणि केंद्र सरकारला करावा लागेल. असे म्हणत शिवसेना आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मनोज जरांगे यांच्यासोबत जीवाभावाचे संबंध, ते माझं ऐकतील- निलेश राणे
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणावरील आंदोलनाबाबत बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले कि, आरक्षणाचा विषय सुटला पाहिजे. विषय दुसरीकडे जाऊ नये. चांगल्या वातावरणात आपली मागणी धरा, असा सल्ला मनोज जरांगे यांना दिलाय. मनोज जरांगे यांच्यासोबत जुनी ओळख आहे, जीवाभावाचे संबंध आहेत. म्हणून मी त्यांना सांगू शकतो, आणि ते माझं ऐकतील, अस मला वाटतं. कारण जुने संबंध आहेत, आणि ते विसरलो नाहीत आणि तेही विसरलेले नसतील.
गणरायाने नेहमीच आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. मी निवडून यावं म्हणून कार्यकर्त्यांनी नवस केला होता, तो नवस देखील फेडला. सिंधुदुर्गावर, महाराष्ट्रावर, देशावर कोणतेही संकट येऊ नये, एव्हढे गणरायाजवळ मागण केलं. कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी गणरायाकडे मागणी मागत असतात. असेही निलेश राणे म्हणाले.
आणखी वाचा