शिर्डी : श्रीरामपूर नगरपालिकेत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या निवडून आलेल्या 22 नगरसेवकांपैकी आठ जण फुटले आहेत.

काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी वेगळी गटनोंदणी केली आहे. काँग्रेसचा फुटलेला गट शहराच्या विकासासाठी समर्थन देणार आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या पत्नीचा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे जयंत ससाणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

श्रीरामपूर नगरपरिषदेत सत्ता काँग्रेसची आहे, तर नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या अनुराधा अधिक आहेत. एकूण 32 जागांपैकी काँग्रेसचे 22 नगरसेवक आहेत, तर महाआघाडीचे 10 नगरसेवक आहेत.