NEET Exam Result Mess बीड:  देशात एकीकडे नीट (NEET) पेपरफुटीवरुन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना दुसरीकडे री-नीट परीक्षेचा निकाल (NEET Exam Result 2026) जाहीर झाला आहे. देशात एकीकडे नीट (NEET) पेपरफुटीवरुन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना दुसरीकडे री-नीट परीक्षेचा निकाल (NEET Exam Result 2026) जाहीर झाला आहे. असेअसताना नीट-यूजी परीक्षेभोवतीचं वादळ काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. आधी पेपरफुटी (NEET Paper Leak Case), त्यानंतर पुनर्परीक्षा आणि आता थेट गुणांवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. उत्तरपत्रिकेनुसार 522 गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्याच्या स्कोअरकार्डवर अवघे 65 गुण दाखवल्याचा आरोप बीड (Beed) मधील एका परीक्षार्थीने केलाय . बीडमधील या प्रकरणामुळे एनटीएच्या मूल्यमापन प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित झाले असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारीही सुरू झाली आहे.बीडमधील विद्यार्थी सोहम गवते याने नीट-यूजी परीक्षेनंतर आपल्या उत्तरपत्रिकेच्या आधारे 522 गुण मिळत असल्याचा दावा केला आहे. मात्र एनटीएने जाहीर केलेल्या अधिकृत स्कोअरकार्डमध्ये त्याला केवळ 95 गुण देण्यात आल्याचं समोर आलं आहे.

Continues below advertisement

नीट पेपर फुटीनंतर (NEET Paper Leak Case) 21 जून रोजी देशभरात पुन्हा परीक्षा घेण्यात आली असून याचा निकाल 16 जुलैला जाहीर झाला. मात्र या निकालात प्रचंड गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. अन्सर की नुसार 522 गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष स्कोर कार्डवर मात्र अवघे 95 गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये तीव्र संताप आणि तणावाचे वातावरण आहे. बीडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून राज्य पातळीवर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अन्सर की प्रमाणे मोजलेल्या गुणांपेक्षा कित्येक पटीने कमी गुण स्कोर कार्डवर दिसत असल्याने विद्यार्थ्यांसहपालकवर्ग संभ्रमात आहे. एनटीएच्या (NTA) या गलथान कारभारामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहे. आधीच पेपर फुटीमुळे बदनाम झालेली एनटीए आता यावर काय स्पष्टीकरण देणार, याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.

NEET Exam Result Mess : 522 गुण मिळणे अपेक्षित, मात्र स्कोर कार्डवर अवघे 95 गुण

Continues below advertisement

बीड मधील सोहम नितीन गवते या विद्यार्थ्याने कोणताही क्लास न लावता दिवस-रात्र एक करून अभ्यास केला. वेबसाईटवरील माहितीनुसार त्याला 522 गुण मिळणे अपेक्षित होते. सा पुरावाही त्याच्याकडे आहे. मात्र एनटीए मार्फत ई-मेलवर आलेल्या स्कोर कार्डवर त्याला अवघे 95 गुण दाखवण्यात आले आहे. परिणामीयाप्रकरणामुळे सोहम गवतेलाजबरधक्काबसलाआहे. तर खचलेल्या सोहमने आता समूपदेशकांकडे धाव घेतली असून त्याच्या पालकाने न्यायालयात जाण्याची तयारी केलीये.

Beed NEET Exam Result Mess : विद्यार्थी संभ्रमात, पालक न्यायालयात दाद मागणार

असाचकाहीसाप्रकार वडवणी येथील ज्ञानेश्वरी अनिल कुमार पवार यांच्याबाबतीत घडलाआहे. ज्ञानेश्वरी ही टॉपरच्या शर्यतीत होती. पेपर सोडल्यानंतर तिने पाहिले असता 720 पैकी तब्बल 700 गुण मिळणे अपेक्षित होते. मात्र मिळालेली ओएमआर शीट चुकीची असल्याचा दावा तिने केला आहे. तिच्या प्रत्यक्ष स्कोर कार्ड वर अवघे 87 गुण मिळाले. यात प्रश्नपत्रिका पुरावा असल्याचा दावा ज्ञानेश्वरीने केलाय.

इतर महत्वाच्या बातम्या 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI