NEET Exam Paper Leak Case Parbhani : नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर याचे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत. परभणीच्या (Parbhani News) गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील प्रथमेश मोहन राठोड या 19 वर्षीय तरुणाने नीट परीक्षेत पास होईल का? या विवंचनेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या आठवणीत हंबरडा फोडलाय. पेपर फुटल्यानंतर आता कसे होईल? असे तो म्हणत होता, असे त्याच्या कुटुंबियांने सांगितले. शिवाय का हे पेपर फुटीवाले सामान्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत, असा सवाल ही त्यांच्या कुटुंबीयांने उपस्थित केलाय.
Parbhani : परीक्षा दिल्यानंतरतोफार आनंदीहोता, मात्रपेपरफुटला अन् क्षणातहोत्याचंनव्हतंझालं...
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील रहिवासी मोहन राठोड यांचा मुलगा प्रथमेश राठोड हा इयत्ता बारावी शिक्षण घेत होता. प्रथमेशनांदेड येथे नीटची तयारी करीत होता. चार दिवसापूर्वी तो गावाकडे आला होता. बुधवारी रात्री जेवण करून आम्ही झोपलो. प्रथमेश राठोड हा अभ्यासासाठी त्याच्या रूममध्ये गेला. गुरुवारी मध्यरात्री एक वाजता प्रथमेश राठोड हा उलट्या करत असल्याचा आवाज त्याच्या आईला आला. त्याची आई प्रथमेश जवळ गेली, असता विषारी औषधाचा वास आला. त्यावेळी त्याला विचारले असता त्याने मी नीट परीक्षा पास होईल का असे बोलला. आरडाओरड्याचा आवाज ऐकल्यानंतर आम्ही त्याला प्रथम उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गंगाखेड पोलीस स्टेशन येथे विनायक राठोड यांच्या तक्रारीवरून प्रथमेश याने नीटची परीक्षा पास होईल का? अशी धसकी घेऊन विषारी औषध प्राशन केल्याची नोंद करण्यात आली. सध्याया प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
NEET Exam Paper Leak Case : विषारी द्रव्य पिऊन जीवनयात्रा संपवली, अवघं कुटुंब हळहळल
डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि बंजारा समाजातून खडतर प्रवास करून पुढे आलेल्या प्रथमेश राठोड ने नीट परीक्षा दिल्यानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबीयाला विश्वास होता की प्रथमेशला चांगले मार्क पडतील आणि तो डॉक्टर होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकेल. मात्र पेपर फुटला आणि होत्याचे नव्हते झाले. आता पुन्हा पेपर द्यावा लागेल, पुन्हा नव्याने तयारी करावी लागेल, या एक ना अनेक आशा प्रश्नांनी प्रथमेशला ग्रासले होते. त्यातूनच त्याने विषारी द्रव्य पिऊन आपली जीवनयात्रा संपवली आणि अवघ कुटुंब हळहळलय.
NEET Exam Paper Leak Case : पेपर देवून आला तेंव्हा खूप खुश होता, पण...
पेपर देवून आला तेंव्हा खूप खुश होता पण. जेंव्हा पेपर फुटल्याचे कळले तेंव्हा खूप टेन्शनमध्ये आला होता. म्हणत होता, आई आता कसे होईल. मी म्हणाले होते, टेन्शन घेवून नको. अशीप्रतिक्रियाप्रथमेशच्या आईनेदेतआपलंदुःखव्यक्तकेलंआहे. माझा पेपर खूप छान गेलेला आहे, पण पेपर फुटीचे प्रकरण आले तेंव्हा तो खूप टेन्शनमध्ये आला. आता पुढचा पेपर कसा जाईल? असे तो म्हणत असल्याचेप्रथमेशचे वडील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI