Neelam Gorhe On Sanjay Raut : महिलांवर गलिच्छ भाषेत आरोप करणारे काही लोक हिरो बनण्याच्या नादात झिरो होत चलेले आहेत. एका महिलेबद्दल लोकप्रतिनिधीने अशा भाषेचे वापर करून टीका करणे हे अजिबात योग्य नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य राहील आणि याबाबत निवडणूक आयोग दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल. तर अशा काही लोकांच्या सकाळच्या डराव- डरावमध्येही काही तथ्य नसतं. त्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची बोचरी टीका विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केली. निलम गोऱ्हे या सध्या वाशिम (Washim) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नवनीत राणांवर (Navneet Rana) केलेल्या संजय राऊतांच्या टीकेवरुन खरपूस समाचार घेतलाय.


कुटुंबातील महिलांना असे शब्द चालतील का? 


काही व्यक्तींना असं वाटत  शिवराळ भाषा वापरून आपण हिरो ठरतो. मात्र, अस महिला बद्दल वाईट बोलणारे झिरो आहेत. राऊतांवर आरोप करणाऱ्या महिलांना त्यांनी किती गल्लीछ भाषेत शिविगाळ केली आम्ही एकल आहे. आपल्या कुटुंबातील महिलांना चालतील तेच शब्द इतर महीलाबद्दल वापरावेत. राऊतांनी नवनीत राणा बद्दल वापरलेला शब्द पुन्हा वापरणे योग्य नाही. त्यामुळे त्यांचा अपमान होईल. म्हणून मी तो शब्द बोलत नाही. मात्र त्यांनी केलेला शब्द प्रयोग हा अतिशय चुकीचा आणि एका महिलेचा अवमान करणार आहे. त्यामुळे त्यावर निवडणूक आयोगाने याची तात्काळ दखल दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही निलम गोऱ्हे यांनी केलीय. 


काय म्हणाले होते संजय राऊत?


लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अमरावतीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली आहे. तसंच ज्या बाईनं मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, ज्या बाईनं मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला, मातोश्रीविषयी अपशब्द वापरले, हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले. त्या बाईचा पराभव करणं शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे. ती नाची...डान्सर.. बबली.. तुम्हाला खुनावेल.. पडद्यावरून इशारे करेल.. पण भुरळून जाऊ नका.. अशा एका नटीने विश्वामित्रांनाही फसवले होते, असंही राऊतांनी म्हटलं आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या