एक्स्प्लोर

वैष्णवी प्रकरणात तपास करून जालिंदर सुपेकरांना सुद्धा सहआरोपी करण्याची आवश्यकता; विधीमंडळ समितीच्या अहवालात पोलिसांवर कडक ताशेरे

Vaishnavi Hagawane Case | Jalinder Supekar: या प्रकरणी हगवणे कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेले पुण्यातील तत्कालीन पोलिस महानिरीक्षक जालींदर सुपेकर यांचा सहभाग व हस्तक्षेप तपासादम्यान समोर आला आहे.

Vaishnavi Hagawane Case | Jalinder Supekar:  हगवणे कुटुंबाच्या रानटी अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये अनेक त्रुटी असल्याचं विधिमंडळाच्या महिला, बालकांच्या हक्क आणि कल्याण समितीच्या अहवालांमधून समोर आलं आहे. या समितीने पोलिसांच्या पोलिसांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढताना जालिंदर सुपेकर यांची सखोल चौकशी करून त्यांना सहआरोपी करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. या अहवालाचा तपशील समोर आला असून यामध्ये जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीच्या खात्यावर रुखवताच्या नावाखाली तब्बल दीड लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी चौकशी करून त्यांना सुद्धा सहआरोपी करण्यात यावे, असेही अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. 

जालींदर सुपेकर यांचा सहभाग व हस्तक्षेप तपासादम्यान समोर

या प्रकरणी हगवणे कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेले पुण्यातील तत्कालीन पोलिस महानिरीक्षक जालींदर सुपेकर यांचा सहभाग व हस्तक्षेप तपासादम्यान समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तापसापासून सुपेकर यांनी दूर ठेवावे असा अहवालात म्हटलं आहे. सुपेकरांची एक ध्वनीफित प्रसारीत झाली आहे. तिची न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) विभागाकडून तपासणी करून सुपेकरांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांना सहआरोपी करावं, असं अहवालात नमूद करण्यात आला आहे.

दरम्यान, अहवालामध्ये आत्महत्या दिसत असली तरी पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार हुंडाबळीचे प्रकरण असल्याचे अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करून त्यांचा सहभाग असल्यास त्यांना निलंबित करून सहआरोपी करण्याची आवश्यकता असल्याचे सुद्धा या समितीने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे. विधिमंडळाच्या महिला व बालकांच्या हक्क आणि कल्याण समितीने आपला पहिला अहवाल सादर केला आहे. या पहिल्या अहवालामध्ये सुपेकरांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे दाम्पत्याच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. 

पुरावे सुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी

या समितीकडून सरकारला व्यवस्थेमधील त्रुटी दूर करण्यासाठी सुद्धा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. वैष्णवीचा  पती सासरच्या लोकांकडून अमानुष मारहाण, छळ, जाच होत असल्याचे आणि हुंड्याच्या माध्यमातून ब्रॅण्डेड गाडी, चांदीची भांडी, सोने, रोख रक्कम विविध वस्तू घेतल्याचे सबळ पुरावे असल्याचे सुद्धा म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तातडीने तपास पूर्ण करून आरोपी आणि सहआरोपींविरोधात पुरावे सुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे सुद्धा अहवालात म्हटलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Income Tax Raid Kolhapur: कोल्हापुरात बड्या उद्योजकाच्या आलिशान बंगला अन् कारखान्यावर छापेमारी, तीन राज्यात झाडाझडती; दसऱ्यालाच आलिशान पावणेदोन कोटींच्या कारची खरेदी!
कोल्हापुरात बड्या उद्योजकाच्या आलिशान बंगला अन् कारखान्यावर छापेमारी, तीन राज्यात झाडाझडती; दसऱ्यालाच आलिशान पावणेदोन कोटींच्या कारची खरेदी!
Rinku Singh : अंडरवर्ल्डच्या टार्गेटवर टीम इंडियाचा स्टार, दाऊदच्या गँगने रिंकू सिंगला 3 वेळा धमकी, मागितली इतक्या कोटींची खंडणी, जाणून घ्या प्रकरण
अंडरवर्ल्डच्या टार्गेटवर टीम इंडियाचा स्टार, दाऊदच्या गँगने रिंकू सिंगला 3 वेळा धमकी, मागितली इतक्या कोटींची खंडणी, जाणून घ्या प्रकरण
Crime News:  पहाटे नवरा साखरझोपेत असताना बायकोने अंगावर उकळतं तेल ओतलं, जखमांवर मसाला फासला, म्हणाली, 'जर ओरडलास तर...'
पहाटे नवरा साखरझोपेत असताना बायकोने अंगावर उकळतं तेल ओतलं, जखमांवर मसाला फासला, म्हणाली, 'जर ओरडलास तर...'
Breast Cancer: महिलांनो.. ब्रेस्ट कॅन्सरची 'ही' लक्षणं कदाचित माहित नसतील, चुकूनही दुर्लक्ष करू नका, स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...
महिलांनो.. ब्रेस्ट कॅन्सरची 'ही' लक्षणं कदाचित माहित नसतील, चुकूनही दुर्लक्ष करू नका, स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Janshatabdi Missing Coach | जनशताब्दी एक्सप्रेसमधून एका डब्याशिवाय धावली, प्रवाशांची गैरसोय
Electricity Employee Strike | वीज कर्मचाऱ्यांचा 72 तासांचा संप, राज्यावर वीज संकटाची शक्यता
BJP On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला धतूरा? उपाध्येंचा हल्लाबोल
Ajit Pawar Omlympic : राज्य ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवारांची उमेदवारी
Porsche BMW Crash | बेदरकार रेस, पोर्शे-बीएमडब्लू कारचा मुंबईत भीषण अपघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Raid Kolhapur: कोल्हापुरात बड्या उद्योजकाच्या आलिशान बंगला अन् कारखान्यावर छापेमारी, तीन राज्यात झाडाझडती; दसऱ्यालाच आलिशान पावणेदोन कोटींच्या कारची खरेदी!
कोल्हापुरात बड्या उद्योजकाच्या आलिशान बंगला अन् कारखान्यावर छापेमारी, तीन राज्यात झाडाझडती; दसऱ्यालाच आलिशान पावणेदोन कोटींच्या कारची खरेदी!
Rinku Singh : अंडरवर्ल्डच्या टार्गेटवर टीम इंडियाचा स्टार, दाऊदच्या गँगने रिंकू सिंगला 3 वेळा धमकी, मागितली इतक्या कोटींची खंडणी, जाणून घ्या प्रकरण
अंडरवर्ल्डच्या टार्गेटवर टीम इंडियाचा स्टार, दाऊदच्या गँगने रिंकू सिंगला 3 वेळा धमकी, मागितली इतक्या कोटींची खंडणी, जाणून घ्या प्रकरण
Crime News:  पहाटे नवरा साखरझोपेत असताना बायकोने अंगावर उकळतं तेल ओतलं, जखमांवर मसाला फासला, म्हणाली, 'जर ओरडलास तर...'
पहाटे नवरा साखरझोपेत असताना बायकोने अंगावर उकळतं तेल ओतलं, जखमांवर मसाला फासला, म्हणाली, 'जर ओरडलास तर...'
Breast Cancer: महिलांनो.. ब्रेस्ट कॅन्सरची 'ही' लक्षणं कदाचित माहित नसतील, चुकूनही दुर्लक्ष करू नका, स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...
महिलांनो.. ब्रेस्ट कॅन्सरची 'ही' लक्षणं कदाचित माहित नसतील, चुकूनही दुर्लक्ष करू नका, स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...
Dombivli Accident: राष्ट्रीय फुटबॉलपटूचा भीषण अपघात, भरधाव कारने धडक देत फरफटत नेलं; आरोपी अद्याप फरार
राष्ट्रीय फुटबॉलपटूचा भीषण अपघात, भरधाव कारने धडक देत फरफटत नेलं; आरोपी अद्याप फरार
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला, आता फक्त SC, नवबौद्ध विद्यार्थ्यांनाच प्राधान्य मिळणार
सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवला, आता योजनांमध्ये फक्त नवबौद्धांना प्राधान्य
Dadar Kabutar khana: दादरमध्ये जैन समाजाकडून मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभेचं आयोजन
हसावं की रडावं समजेना, दादरमध्ये जैन समाजाकडून मृत कबुतरांसाठी प्रार्थना सभेचं आयोजन
Women's World Cup 2025 Points Table : स्वत: तर घाण केलीच टीम इंडियाचंही वाट्टोळं केलं, पाकिस्तानची पराभवाची हॅटट्रिक, पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ
स्वत: तर घाण केलीच टीम इंडियाचंही वाट्टोळं केलं, पाकिस्तानची पराभवाची हॅटट्रिक, पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ
Embed widget