ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अजित पवारांवर आरोप करणाऱ्या लक्ष्मण हाकेंना आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो, त्याला कुठे महत्व देता असं सुनील तटकरे म्हणाले. हाके, डाके, पडळकर अशा लोकांना महाराष्ट्र फार काही महत्व देत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
अजित पवारांनी ओबीसींचा निधी अडवला, अर्थखात्याला ते चिकटून बसलेत अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली होती. आपण बोलायला लागलो तर अजित पवारांची कपडेही राहणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर सुनील तटकरेंनी त्यांना उत्तर दिलं.
Sunil Tatkare On Laxman Hake : हाके-पडळकर काय म्हणतात त्याला महत्व नाही
सुनील तटकरे म्हणाले की, ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो त्याला कशाला महत्व द्यायचं. राज्याचे प्रमुख हे शेवटी मुख्यमंत्री असतात आणि कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की कुठल्याही प्रकारचा निधी हा दुसऱ्या खात्यात वळवला गेला नाही. कुठल्याही खात्याच्या निधी कमी करण्यात आला नाही. अजितदादा पवार हे उत्तम अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करत आहेत. अशी पावती तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली असेल तर हाके-पडळकर काय बोलतात त्यांना कशाला महत्व द्यायचं?
Sunil Tatkare On Gopichand Padalkar : तोल जाऊन कोण कुठे पडतं हे सगळ्यांना माहिती
आमच्या प्रवक्त्यांनी त्यांना जी काही नावं, विशेषणे दिली आहे, मला ते शब्द बोलणंही चांगलं वाटत नाही. पण त्यांची लायकी काय आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तोल जाऊन कोण कुठे पडत होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांना फार महत्त्व देऊ नये.
Raigad Guardian Minister : मुख्यमंत्री रायगडचा पालकमंत्री ठरवतील
सुनील तटकरे म्हणाले की, "शेवटी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री कोण असलं पाहिजे हा सर्वस्वी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत जो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील तो आम्हाला मान्य आहे. एकनाथ शिंदे यांनी काय मागणी करायची तो त्यांना अधिकार आहे."
ही बातमी वाचा: