Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांना महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसतंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं नाशिकमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय शिबीर घेतलं. या शिबिरात सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मतचोरीचं प्रात्यक्षिकही दाखवलं.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिकमध्ये एकदिवसीय शिबीर पार पडलं. या शिबीरासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही गर्दी केली होती. यावेळी मतचोरीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.

Continues below advertisement

मतचोरीचं प्रात्यक्षिक

राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनंतर कथित मतचोरीचा मुद्दा चर्चेत आला. त्यावरून शरद पवारांची राष्ट्रवादीही मैदानात उतरल्याचं दिसून आलं. नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मतचोरीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. मतदारांनी एका उमेदवाराला दिलेलं मत हे दुसऱ्या उमेदवाराला जात असल्याचा दावा या प्रात्यक्षिकातून करण्यात आला. व्हीव्हीपॅटमध्येही मतचोरी शक्य असल्याचा दावा या प्रात्यक्षिकांमधून करण्यात आला.

या शिबिराआधी पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या जाहिरातबाजीने. नाशिकमधल्या अनेक दैनिकांमध्ये 'देवा तूच सांग' असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावरुन रोहित पवारांनी भाजपला टोलाही लगावला.

राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला देवाभाऊ जाहिरात लावा असे सांगण्यात आले होते, मात्र नाव कुठेच छापले नव्हते. आमची जाहिरात बघा, आम्ही आमचे नाव छापले आहे. त्यांनी नाव छापलेले नाही, याचा अर्थ मेघा इंजिनिअरिंग कंपनीने जाहिरात दिली का? असा प्रश्न यावेळी आमदार रोहित पवार यांनी विचारला.

गेल्या काही दिवसात विरोधकांकडून सातत्यानं मतचोरीचा आरोप करण्यात येत होता. राष्ट्रवादीच्या या शिबिरात मतचोरीचं थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. शिबिराच्या व्यासपीठावरून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

आमदार-खासदार अनुपस्थित, कारण दिले

दरम्यान, या शिबिराला काही नेत्यांनी दांडी मारली. पक्षाचे 5 आमदार आणि 2 खासदार अनुपस्थित राहिल्यानं याची चर्चा रंगली. यापैकी खासदार अमोल कोल्हे हे तब्येतीच्या कारणास्तव गैरहजर राहिले. तसे पत्र त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंना लिहिलं.

आमदार रोहित पाटील हे त्यांच्या घरात दुःखद घटना घडल्यानं अनुपस्थित राहिले. भिवंडीचे खासादर सुरेश म्हात्रे हे नवी मुंबईतील मोर्चामुळे अनुपस्थित राहिले. आमदार राजू खरे हे त्यांच्यावर

शस्त्रक्रिया झाल्यानं शिबिराला अनुपस्थित राहिले. तर पंढरपूरचे आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण आबा पाटील आणि आमदार उत्तम जानकर हे तिघेही उशीरानं शिबिराच्या ठिकाणी पोहोचले.

ही बातमी वाचा: