Maharashtra Politicis अकोला : भाजप प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) यांच्या अजित पवारांवरील (Ajit Pawar) वक्तव्याचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार समाचार घेतलाय. गणेश हाकेंवर टीका करताना आमदार मिटकरींनी हाकेंसारख्या विद्वान माणसाच्या ज्ञानाचा भाजप उपयोग करत नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी हाकेंनी असं विधान केल्याचे मिटकरी म्हणालेय. आमचा पक्ष हाकेंसारख्यांना कवडीची किंमत देत नसल्याचंही मिटकरी म्हणालेय. गणेश चतुर्थीपूर्वीच भाजपाने गणेश हाकेंचं विसर्जन करू नये, ही काळजी त्यांनी घ्यावी असा टोलाही यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी लगावलाय
गणेश हाकेंची पक्षातली अवस्था बाण लागलेल्या राजहंसा सारखी- अमोल मिटकरी
भाजपचे प्रवक्ते गणेश हाके हे अतिशय सज्जन,सात्विक आणि बुद्धिमान प्रतिमा असलेले व्यक्तिमत्व आहे. मात्र त्यांच्या या सज्जनतेला आणि बुद्धिमत्तेला त्यांच्या भाजप पक्षाने का गांभीर्याने घेतलं नाही, हा माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडलेलं कोडं आहे. इतक्या वर्षांपासून उपेक्षित असलेले गणेश हाके यांना आता तरी विधानसभे साठी संधी मिळेल, या आशे पोटी त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका केली. मात्र गणेश हाके यांची त्यांच्याच पक्षातली अवस्था बाण लागलेल्या राजहंसा सारखी आहे. त्यामुळे त्यांना नवी ऊर्जा प्राप्त होण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र आम्ही त्यांना कवडीचीही किंमत देत नाही. अशा सज्जन माणसाचे हाल देखील आम्हाला बघवत नाही. त्यामुळे गणेश हाके यांनी गणेश चतुर्थीच्या आधीच पक्षाने त्यांचे विसर्जन करू नये, या बाबत काळजी घ्यावी, अशी बोचारी टीका आमदर अमोल मिटकरी यांनी गणेश हाकेंवर केली आहे.
नेमकं काय म्हणाले होते गणेश हाके?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. अशातच आता महायुतीतील नेते ऐकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेली युती ही दुर्देवी आहे. हा असंगाशी संग केला असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केलं आहे. दरम्यान, हाके यांच्या वक्तव्यामुळं महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.
लोकसभा निवडणुकीत अहमदपूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडलेच नाहीत. यामुळे भाजपाच्या खासदाराचा पराभव झाल्याचे गणेश हाके म्हणाले. त्यामुळं अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्देवी आहे. खरं म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगशी संग म्हणतात असा संग आमच्यासोबत घडवला आहे असं हाके म्हणाले. दरम्यान, हाके यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते काय भूमिका घेणार हे पाहणं देखीवल महत्वाचं ठरणार आहे. कारण मागील दोन दिवसापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आमि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी ताँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.
हे ही वाचा