Aurangabad News : सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे पाहायला मिळालं. दोन्ही नेते एकाच गाडीतून गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये (Aurangabad) ज्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार थांबले आहेत, त्याच हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सुध्दा काही वेळीपूर्वी दाखल झाले होते. त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला.
राज्यात कालपासून विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे गट आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. यातच काल शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं गोठावलं आहे. तसेच शिवसेना हे नाव देखील दोन्ही गटांना वापरता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगानं दिला आहे. यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. यावरुन दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आज आणखी एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. ती म्हणजे शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांची. या दोन्ही नेत्यांनी औरंगाबादमध्ये एकाच गाडीतून प्रवास केला आहे.
दोन्ही नेते एकाच गाडीतून गेवराईकडे रवाना
शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे औरंगाबादहून गेवराईच्या दिशेने गेले आहेत. गेवराईत आज माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत. शिवजारीव पंडीत हे शरद पवार यांच्या निष्ठावंत सहकारी आहेत. त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज गेवराईत होणार आहे. या सोहळ्याला शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांच्यासह सर्वच पक्षातील दिग्गज नेते उपस्थिती लावणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री सुरेश धस, माजी मंत्र दिलीपराव देशमुख, आमदार नमिता मुंदडा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: