Jayant Patil : "पराभव हा एका मताने केला काय आणि हजार मतांनी केला काय, पराभव हा पराभवच असतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना कोल्हापुरातून निवडणुकीला उभं राहण्याची ही संधी होती. पराभव झाला तर हिमालयात जाईन असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता ते हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन, माझी ही इच्छा आहे हिमालयात जाण्याची. चंद्रकांत पाटील आणि माझे चांगले संबंध आहेत." असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय मिळवला आहे. भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत एन्ट्री केली आहे. या निकालानंतर जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
"चंद्रकांत पाटील यांना कोथरूडचा मतदारसंघ देखील सोडावा लागेल असं वाटतंय, इतकी आपुलकी येथे दिसतेय, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
"महाविकास आघाडीने कोल्हापुरात एकसंघ पद्धतीने काम केलं आहे. पुरोगामीत्वाकडे महाराष्ट्र झुकलेला आहे. हा निकाल म्हणजे याचेच द्योतक आहे. करवीर नगरीने दिलेला निकाल मार्गदर्शक असून राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करत आहेत. या निकालातून त्यांना चपराक मिळाली. महाविकास आघाडीच्या कामांमुळे हा विजय झाला आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
"दंगल घडवून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, आम्ही खंबीर आहोत. प्रत्येकाची श्रध्दा असते. आम्ही देखील प्रभू रामांना मानतो. आमच्यातही हिंदुत्वाचा भाग आहे. परंतु,आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही. फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचे आमच्यावर संस्कार आहेत. 30 वर्षे यांना हनुमान चालिसा आठवली नाही. भाजप जे सांगत आहे ते राज ठाकरे करत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
Chandrakant Patil : चंद्रकांतदादा हिमालयात जा, राष्ट्रवादीकडून तिकीट बूक, एसी थ्री टायर तिकीट पाठवणार
'सत्यजित कदम लढले तर फेस आला, मी लढलो असतो तर काय झालं असतं' : चंद्रकांत पाटील