दापोली : नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत असून हे प्रकरण नागरिकांना छळण्यासाठी बदनाम करण्यासाठी व नागरिकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय असा गंभीर आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील यांनी म्हटलं की, गोसावी यांना अटक झाली कारण त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.  त्यांचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने ते आरोप केले आहेत. यामध्ये 25 कोटी रुपये वानखेडे यांनी मागितल्याचे तो बोलतो आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. केंद्रातून देखील एनसीबीची एक टीम आली आहे. ही टीम व्यवस्थित चौकशी करून नेमकं काय सत्य आहे हे समोर आणेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मागच्या काही दिवसांत पाहिलं असेल एनसीबीवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत.  विशेष करून बोगस कारवाई करून लोकांना त्रास दिला जात असल्याचं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशा आहे केंद्रीय टीम योग्य दिशेनं तपास करेल, असं पाटलांनी म्हटलंय.


क्रांती रेडकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाल्या, मी बाळासाहेबांचा आदर्श घेऊन वाढलेली मुलगी, न्याय करा!


जयंत पाटील म्हणाले की, नवाब मलिक जे आरोप करत आहेत यामध्ये तथ्य असल्याचं पाहिला मिळत आहे. खासकरून क्रूझ पार्टी प्रकरणी जे आरोप होतायत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शाहरुख खानच्या मुलाला क्रूझ वर जाण्याआधीचं रोखण्यात आलं होतं हे देखील गंभीर आहे. एकंदरीत केंद्रीय यंत्रणा अधिकारांचा चुकीचा तर वापर करत नाहीत ना याचा संशय येऊ लागला आहे. शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत घडलंय आणखी इतरांच्या बाबतीतही झालं असेल त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.


हे ही वाचा- Nawab Malik VS Sameer Wankhede : मी जन्मानं हिंदू होतो आणि आताही हिंदूच; समीर वानखेडेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती


एनसीबीची टीम वानखेडेंच्या चौकशीसाठी आलीय. वानखेडेची चौकशी करतेय. वानखेडे याने घेतलेला दाखला व IRS मध्ये जो प्रवेश घेतला तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला याचं गणित लवकरच उकळेल आणि फसवणूक कुणी केली व कशी केली याचा खुलासादेखील लवकरच होईल. चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल. त्यामुळे ही टीम चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आली नसावी असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.


नवाब मलिक हे सत्य गोष्टी समोर आणत आहेत त्या सत्य आहेत. केंद्राच्या या यंत्रणा चुका करुन दिशाभूल करत आहेत. या यंत्रणांचा वापर करून नागरिकांना छळण्याचा प्रकार होतोय असेही जयंत पाटील म्हणाले.