एक्स्प्लोर

Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ते निष्ठावान नेते असून, पक्षाचे विदर्भातील महत्त्वाचे संघटक मानले जातात. प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय असून त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.

Rajendra Jain: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी मिळाली आहे. सुनील तटकरे यांनी घोषणा केली आहे. राजेंद्र जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. मंत्री छगन भुजबळ यांच्या सातपुडा निवासस्थानी दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिल्ली हायकमांडकडून आलेल्या निरोपाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. 

कोण आहेत राजेंद्र पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) एक निष्ठावान नेते असून, पक्षाचे विदर्भातील महत्त्वाचे संघटक मानले जातात. प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय असून त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. यापूर्वी, ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. तर, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये ते महत्त्वाचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या वेळीही त्यांच्या नावाची पक्षाच्या कोअर कमिटीत प्रबळ दावेदार म्हणून चर्चा झाली होती.

नवनीत राणांच्या नावाची चर्चा 

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, यावरून जोरदार चर्चा रंगली होती. या जागेवर भाजप नेत्या नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावत नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादीकडून संपला आहे, असे स्पष्ट केले होते. रोहित पवार यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला होता. रोहित पवार म्हणाले होते की, "या जागेवरून छगन भुजबळ यांना संधी दिली पाहिजे. भाजप विचाराधीन किंवा भाजपच्या व्यक्तीला सुनेत्रा पवारांची जागा आहे, ती दिली गेली तर पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या चरणी गेला असं म्हणावं लागेल, किंवा तो दिल्लीसमोर झुकलेला आहे, असा संदेश जाईल." रोहित पवारांच्या या सल्ल्यावर सुनील तटकरे यांनी तीव्र शब्दांत पलटवार केला. "आमच्या पक्षात आम्ही उमेदवारी कोणाला द्यावी याबाबत आम्हाला त्यांचा सल्ला घेण्याची पाळी आलेली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षात पहिले सल्ले द्यावे. त्यांचे संख्याबळ कसे वाढेल यावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित करावे," असे सुनील तटकरे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Operation Tiger: आम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही, गोकुळ गीतेंना उबाठाने मतदान केलं, ते आता शिंदे साहेबांसोबत, त्यामुळे...; 'ऑपरेशन टायगर'वर शिंदेसेनेतील नेत्याचं मोठं विधान
आम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही, गोकुळ गीतेंना उबाठाने मतदान केलं, ते आता शिंदे साहेबांसोबत, त्यामुळे...; 'ऑपरेशन टायगर'वर शिंदेसेनेतील नेत्याचं मोठं विधान
विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
Maharashtra Legislative Council Video : 'मी बोलायचे का नाही, हे तुम्ही सांगणारे कोण?’; विधान परिषदेत बच्चू कडू-प्रवीण दरेकर पुन्हा आमनेसामने, सभापतींना करावी लागली मध्यस्थी
'मी बोलायचे का नाही, हे तुम्ही सांगणारे कोण?’; विधान परिषदेत बच्चू कडू-प्रवीण दरेकर पुन्हा आमनेसामने, सभापतींना करावी लागली मध्यस्थी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai BEST bus Shevpuri: मुंबईत बेस्टच्या ड्रायव्हरने शेवपुरी घ्यायला बस रस्त्यात थांबवली, जाब विचारताच म्हणाला, 'जा तुझ्या बापाला....'
मुंबईत बेस्टच्या ड्रायव्हरने शेवपुरी घ्यायला बस रस्त्यात थांबवली, जाब विचारताच म्हणाला, 'जा तुझ्या बापाला....'
विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Embed widget