नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) नेमका कुणाचा याबाबत आज निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी पार पडेल. निवडणूक आयोगात आपली बाजू मांडण्यासाठी शरद पवार गटाचा आजचा शेवटचा दिवस असेल. यानंतर गुरुवारपासून अजित पवार गट आपली भूमिका मांडणार आहे. यापूर्वी शरद पवार गटाच्या वतीने अजित पवार गटाने खोटी कागदपत्र सादर केलीय, राष्ट्रीय कार्यकारणी सहभागी सदस्यांची खोटी माहिती दिली, असे आरोप करत कायदेशीर कारवाई करत तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली होती. त्यामुळे आजची सुनावणी महत्वाची असणार आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यासंदर्भात महत्त्वाची सुनावणी आज निवडणूक आयोगात होणार आहे. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगात ही सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत निवडणूक आयोग दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेईल. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. 


यापूर्वी शिवसेना कोणाची याबाबत निवडणूक आयोगात बऱ्याच दिवस सुनावणी चालली होती. आता त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कोणाची याबाबतचा लढा निवडणूक आयोगात जाऊन पोहचला आहे. त्यामुळे यावर सुनावणी घेण्यात येत आहे. यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात पुरावे सादर करण्यात आले आहे. मात्र, अजित पवार गटाकडून सुमारे 20 हजार बोगस शपथपत्रकं दाखल करण्यात आल्याचा आरोप गेल्या सुनावणीवेळी शरद पवार गटाने केला होता. त्यामुळे यावर आजच्या सुनावणीत काही निर्णय येतो का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. सोबतच शरद पवार यांना राष्ट्रवादी पक्ष मिळणार की अजित पवार यांना याकडे संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागलं आहे. 


राष्ट्रवादीतल्या चिन्हाच्या लढाईचा घटनाक्रम



  • 2 जुलै रोजी अजित पवार गटाचा शपथविधी

  • शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात 5 जुलै रोजी कॅव्हिएट दाखल

  • अजित पवार गटानं 30 जून रोजीच झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचा दावा केला, 40 आमदार आपल्या बाजूनं असल्याचाही दावा

  • निवडणूक आयोगानं त्यावर दोन्ही बाजूंना नोटीसा देत 8 सप्टेंबर पर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितलं

  • दोन्ही बाजूची कागदपत्रं पाहिल्यानंतर आयोगानं आता या सुनावणीसाठी 6 ऑक्टोबर ही तारीख दिली होती.

  • अजित पवार गटाने 20 हजार बोगस कागदपत्रे जमा केल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


NCP Crisis: 'राष्ट्रवादी आमचीच', विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या नोटीसेला अजित पवार गटाचे 260 पानी उत्तर