मुंबई : निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाचं चिन्ह आणि नाव हे दोन्ही अजित पवारांना दिलं. राष्ट्रवादी पक्ष कोणी उभारला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. निवडणूक आयोगाने दबावाखाली येऊन हा निर्णय दिलाय, ही एका प्रकारे लोकशाहीची हत्याच आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, निवडणूक आयोगाचा निर्णय आहा अत्यंत योग्यच आहे. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय अजूनही लोकशाहीला धरुन असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलं. 

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे  निवडणूक आयोगनाने दिले आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष गेला असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे आता शरद पवारांना नवं चिन्ह शोधावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तयारी देखील सुरु करण्यात आली होती. जर निवडणुक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने नाही आला तर पक्षाच्या चिन्ह काय असणार यासंदर्भात शरद पवार गटाची बैठक देखील पार पडली होती. 

काय म्हणाले जयंत पाटील? 

निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे. 

या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे.

अजित पवारांसोबत किती आमदार? 

- महाराष्ट्रातील 41आमदार 
- नागालँडमधील 7 आमदार 
- झारखंड 1 आमदार 
- लोकसभा खासदार 2
- महाराष्ट्र विधानपरिषद 5 
- राज्यसभा 1 

शरद पवारांसोबत किती आमदार? 

महाराष्ट्रातील आमदार 15 
केरळमधील आमदार 1
लोकसभा खासदार 4 
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा - 3

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे  निवडणूक आयोगनाने दिले आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष गेला असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे आता शरद पवारांना नवं चिन्ह शोधावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तयारी देखील सुरु करण्यात आली होती. जर निवडणुक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने नाही आला तर पक्षाच्या चिन्ह काय असणार यासंदर्भात शरद पवार गटाची बैठक देखील पार पडली होती. 

ही बातमी वाचा : 

जो पक्ष उभारला आता तोच पक्ष हातून गेला, आता शरद पवारांकडे कोणता पर्याय?