मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतं फुटू नये यासाठी राज्यातील विरोधी पक्षांनी खबरदारी घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत यामध्ये चर्चा होईल.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे विरोधी पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्ष या बैठकीला उपस्थित असतील. विरोधी पक्षांचे काही आमदार एनडीएला मतदान करणार असल्याचं वक्तव्य काल अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलं होतं. त्यानंतर विरोधी पक्ष खडबडून जागे झाले आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपलं मत किती महत्वाचं आहे, याचं महत्व आमदारांना या बैठकीत समजावून देण्यात येईल. त्यामुळे राज्यातील आमदारांची मतं फुटू न देण्याचं आव्हान आता काँग्रेससमोर असणार आहे.

काँग्रेसचे 8 ते 9 आणि राष्ट्रवादीचे 5 ते 6 आमदार एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान करतील, असं अपक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितलं होतं. जवळपास 14 ते 15 जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावाही रवी राणा यांनी केला होता.

पाहा व्हिडिओ :