Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत सहा लाखांची लाच घेताना सिडकोच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. भूखंडाची मोजणी केल्यानंतर मोजणीचा अहवाल देण्यासाठी सहा लाख रुपये लाच स्वीकारण्यात आली होती. याप्रकरणी सिडकोचा भूमिलेख उपाधीक्षक दिलीप बागुले याच्यासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंग हात पकडले आहे. 

Continues below advertisement

आरोपींनी तक्रारदारांकडे 9 लाखा रुपयांची मागणी केली होती

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदारांकडे 9 लाखा रुपयांची मागणी केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे सिडकोच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. नैना क्षेत्रात असलेल्या एका भूखंडाची मोजणी करण्यासाठी तक्रारदारांनी सिडकोकडे अर्ज केला होता. त्यानंतर उपाधीक्षक दिलीप बागुले आणि त्याचा सहकारी कलीमुद्दीन शेख यांनी मोजणीचा अहवाल देण्यास दिरंगाई केली होती. या अहवालासाठी त्यांनी तक्रारदारांकडे नऊ लाख रुपयांची मागणी केली होती. चर्चा अंती हा सौदा सहा लाख रुपयांवर पक्का झाला होता. यानंतर सहा लाखांची लाच घेताना सिडकोच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Continues below advertisement

MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर