National Exit Test : आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 2021-22 सत्राच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या आयुष विद्यार्थ्यांना आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NExT) द्यावी लागणार आहे. देशभरातील आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 2021-22 या वर्षी प्रवेश घेतलेल्या आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात NExT ( National Exit Test) द्यावी लागणार असल्याची घोषणा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केली आहे.
ही पात्रता परीक्षा अंतिम वर्षाची परीक्षा झाल्यानंतर देता येणार आहे. राज्याच्या अधिसूचित वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नाव नोंदवण्यासाठी ही पात्रता परीक्षा बंधनकारक असल्याचंही मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटल आहे . त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना आता अंतिम वर्षाची परीक्षा दिल्यानंतर या पात्रता परीक्षेची ही तयारी करावी लागणार आहे. अंतिम वर्षाची आयुर्वेद आणि होमिओपॅथी परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेक्स्ट बंधनकारक असल्याने सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची घोषणा
आयुषसाठी राष्ट्रीय एक्झिट टेस्ट (NExT) 2021-22 या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लागू होईल, अशी घोषणा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकतीच केली आहे. या प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या चिंतेचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या सरकारी समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री म्हणाले. NExT च्या अंमलबजावणीमध्ये स्पष्टता मिळवण्यासाठी आयुष प्रवाहातील विद्यार्थ्यांकडून अनेक निवेदने आली होती. मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांसोबत या विषयावर बैठक घेतली. यात एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर परवाना मिळविण्यासाठी आणि राज्य किंवा राष्ट्रीय नोंदणीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी ही चाचणी अनिवार्य आहे.
परीक्षेत व्यावहारिक कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी क्लिनिकल केस परिस्थिती, प्रतिमा आणि व्हिडिओ समाविष्ट आहेत. ज्या इंटर्न्सनी त्यांची इंटर्नशिप पूर्ण केली नाही परंतु NExT मध्ये पात्रता प्राप्त केली आहे, ते एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतरच नोंदणी करण्यास पात्र असतील. अशीही माहिती देण्यात आली आहे. नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन (NCISM) कायदा 2020 आणि नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी (NCH) कायदा, 2020 अनुक्रमे 11 जून 2021 आणि 5 जुलै 2021 पासून अंमलात आला. या कायद्यांच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत, कायद्याच्या तरतुदींनुसार आयोगांनी NExT आयोजित करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI