नाशिक : राज्यात गणेशोत्सवाची धूम आणि उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे मराठा आरक्षण आणि जात पडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे. गणेशोत्सवामुळे पोलिसांनी मुंबईतील त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. तर, दुसरीकडे नाशिक (Nashik) जिल्ह्यात प्रांताधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध तब्बल 800 तलाठी (Talathi) आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे, जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement

प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या कडक शिस्त आणि कठोर कामकाजाचा अनुभव कर्मचाऱ्यांना अनेकदा येत असतो. मात्र, कायम ग्रामस्थ आणि सर्वसामान्य नागरिकांच्या टीकेचे धनी बनणाऱ्या ग्रामविकास अधिकारी आणि तलाठी यांनाच एका खमक्या अधिकाऱ्याचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे, तलाठी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी थेट आंदोलनाचा ठिय्या गाठला आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या मनमानी कारभाराविरोधात तलाठी महासंघ नाशिकमध्ये आक्रमक झाला आहे. इगतपुरी व त्रंबकेश्वर प्रांताधिकार्‍यांचा मनमानी कारभार थांबवा, अन्यायकारक निलंबन व फेरा फेर कारवाईचा निषेध करत जिल्ह्यातील तलाठी एकवटल्याचं दिसून आलं. तसेच, निलंबित ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांचे बेकायदेशीर निलंबन व सक्तीच्या कारवाई मागे घ्याव्यात, यांसह इतर मागण्या मान्य कराव्या अशी मागणीही यावेळी तलाठी महोदयांनी केली. 

आपल्या प्रशासकीय सेवेतील या विविध मागण्यांसाठी 15 तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी एकत्र येत आंदोलनात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध जवळपास 800 तलाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला बसले आहेत.

Continues below advertisement

हेही वाचा

मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच पत्नीसह मुली संतापल्या; म्हणाल्या, 'वडिलांना काही झाल्यास डोळे पुसायला रुमाल...'