एक्स्प्लोर

Captain Bharat Bhardwaj Viral Video : दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत

भारत भारद्वाज यांनी आपल्या प्रेयसीला सर्वांसमोर लग्नासाठी मागणी घातली. या भावनिक क्षणाने लाखो लोकांची मने जिंकली असली तरी, त्यामुळे लष्कराच्या नियमांवर आणि कार्यपद्धतींवर एक वादविवादही सुरू झाला आहे.

Captain Bharat Bhardwaj Viral Video : नाशिकच्या (Nashik) कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये (Combat Army Aviation Training School) नुकतंच दीक्षांत सोहळा संपन्न झाला. यावेळी नेहमीप्रमाणे लष्करी शिस्त, पराक्रम आणि आधुनिक विमानचालन कौशल्याचे दर्शन घडले. मात्र दीक्षांत संचलन सोहळ्यानंतर घडलेल्या एका प्रसंगाची सध्या देशभर चर्चा रंगू लागली असून या प्रसंगाने अनेकांची मने जिंकली. तर दुसरीकडे हा प्रसंग वादात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. झालं असं कि, प्रशिक्षण पूर्ण करून वैमानिक म्हणून नव्या जबाबदारीसाठी सज्ज झालेल्या भारत भारद्वाज यांनी आपल्या प्रेयसी आरुषीला सर्वांसमोर लग्नासाठी (Bharat Bhardwaj Proposes Girlfriend) मागणी घातली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी भारत यांनी कठोर प्रशिक्षण पूर्ण केले, त्याच ठिकाणी दीक्षांत सोहळा संपल्यानंतर हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसत त्यांनी आरुषीला अंगठी घालून लग्नासाठी प्रपोज केले. या अनपेक्षित क्षणाने उपस्थित अधिकारी, कुटुंबीय आणि मित्रमंडळी भारावून गेली. आरुषीनेही सर्वांसमोर हा प्रस्ताव स्वीकारताच परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. तर या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आहे. तर दुसरीकडे या भावनिक क्षणाने लाखो लोकांची मने जिंकली असली तरी, त्यामुळे लष्कराच्या नियमांवर (Bharat Bhardwaj Acction) आणि कार्यपद्धतींवर एक वादविवादही सुरू झाला आहे.

 Indian Air Force : लष्कराने घेतली प्रकरणाची दखल,  कारवाई करण्याच्या तयारीत

मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टनच्या प्रपोजलच्या व्हायरल व्हिडिओची लष्कराने दखल घेतली असून, याबाबत स्पष्टीकरण देखील मागितल्या जाण्याची शक्यता आहे. या तरुण अधिकाऱ्याच्या बाजूने किंवा विरोधात मत व्यक्त करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. कॅप्टनची आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्याची इच्छा लष्कराला समजते, परंतु प्रसंग आणि ठिकाण अयोग्य होते. तो एक तरुण अधिकारी असून त्याने कोणताही गंभीर गुन्हा केलेला नसल्यामुळे कोणतीही औपचारिक शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता नसली तरी, त्याच्या वरिष्ठांना या उल्लंघनांची माहिती देण्यात आली आहे आणि त्याला अधिकारी म्हणून आवश्यक असलेले नियम, कायदे आणि वर्तनाबद्दल संवेदनशील बनवण्यास सांगितले असल्याचीही चर्चा आहे.

Captain Bharat Bhardwaj : समाज माध्यमांवर चर्चा, निवृत्त वरिष्ठ अधिकारी तरुण पायलटच्या समर्थनार्थ

दुसरीकडे, नाशिकमधील पासिंग-आऊट परेडमध्ये भारतीय लष्कराचे हवाई अधिकारी कॅप्टन भरत भारद्वाज यांनी केलेला एक व्हायरल प्रस्ताव देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. लष्करी नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची भारतीय लष्कर तपासणी करत असल्याचे वृत्त आहे, तर दुसरीकडे अनेक निवृत्त वरिष्ठ अधिकारी या तरुण पायलटच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. यावर बोलताना निवृत्त लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लन आणि निवृत्त मेजर जनरल राजू चौहान यांनी हा प्रस्ताव म्हणजे सुरक्षेचा भंग असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. लेफ्टनंट जनरल ढिल्लन यांनी असा युक्तिवाद केला की, प्रेम व्यक्त केल्याने सैनिकाची शिस्त किंवा देशभक्ती कमी होत नाही, तर मेजर जनरल चौहान म्हणाले की, ही व्हायरल प्रतिमा लष्करासाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी भरती पोस्टर म्हणून वापरली जाऊ शकते. हा व्हिडिओ हा वाद, लष्कराची कथित प्रतिक्रिया आणि तरुण कॅप्टनच्या बचावासाठी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी मांडलेले युक्तिवाद यावर प्रकाश टाकतो. असंही आता बोललं जात आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates:सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Navi Mumbai Crime: एकनाथ शिंदेंच्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक, भंगारवाल्याकडून दोन लाखांची खंडणी मागितली, नकार मिळताच मारहाण
एकनाथ शिंदेंच्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक, भंगारवाल्याकडून दोन लाखांची खंडणी मागितली, नकार मिळताच मारहाण
Bank Holiday: जुलै 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी राहणार बँका बंद; बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल माहिती
जुलै 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी राहणार बँका बंद; बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल माहिती
Sanjay Raut: ठाकरे सेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, संजय राऊत म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालय गुलाम...'
ठाकरे सेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, संजय राऊत म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालय गुलाम...'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
Dharashiv FDA Raid News: धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
Raj Thackeray House Monkey: राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर माकडांची टोळी, थेट बाल्कनीत पोहोचले, पोलीस अन् फायरब्रिगेड घटनास्थळी
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर माकडांची टोळी, थेट बाल्कनीत पोहोचले, पोलीस अन् फायरब्रिगेड घटनास्थळी
Rohit Sharma on Gautam Gambhir: तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Embed widget