नाशिक: नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. चांदवड तालुक्यातील काजी सांगवी शिवारात ग्रामपंचायत कर्मचारी सचिन हिरे यांनी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली आहे. प्रज्ञा दौलत हिरे व प्रांजल दौलत हिरे अशी या मुलांची नावे असून, या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. कौटुंबिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमागे कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर
चांदवड तालुक्यातील काजी सांगवी शिवारात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिघवद येथील ग्रामपंचायत कर्मचारी सचिन हिरे यांनी आपल्या दोन चिमुरड्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रज्ञा दौलत हिरे व प्रांजल दौलत हिरे अशी दोन्ही मुलांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह विहिरीतून काढून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमागे कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चांदवड पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या: