Nashik News : बनावट ग्रामसेवक पदाचे नियुक्तीचे पत्र घेऊन एक तरुण नाशिकच्या पंचायत समितीत दाखल झाला होता. कागदपत्रांची चौकशी केली असता संबंधित अधिकाऱ्यांना पडताळणीत सत्य आढळले आहे. बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरणाने जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेकडून संबंधित तरुणा विरोधात कायदेशीर कारवाईचे पोलिसांना लेखी पत्र देण्यात आलं आहे. नाशिक पोलिसांकडून संबंधित पत्राच्या आधारे चौकशी सुरु करण्यात आली आहे. संबंधित तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचा देखील प्राथमिक दृष्ट्या समोर आले आहे. नोकरीचे आमिष आणि आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना घडत आहेत. नाशिकच्या या घटनेने सरकारची फसवणूक आणि प्रशासनाची दिशाभूल झाल्याचं उघड झालं आहे. 

Continues below advertisement

नाशिक जिल्हा परिषदेच्या नावाने बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी संबंधित असलेल्या बनावट नियुक्तीच्या आदेशाचं पत्र घेऊन एक तरुण नाशिक जिल्हा पंचायत समितीमध्ये हजर झाला आणि नियुक्तीपत्र सादर केल्याने पंचायत समिती कार्यालयात ते पत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना हे प्रकरण संशयास्पद वाटले मात्र या प्रकरणात तात्काळ चौकशी केल्यामुळे ग्रामसेवक म्हणून नियुक्ती पत्र हे बनावट असल्याचं समोर आले. 

चौकशी केली असता हे पत्र बनावट असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांना पडताळणीत समोर आले.

Continues below advertisement

नाशिक जिल्हा परिषद पंचायत समिती विभागात एक तरुण बनावट नियुक्तीपत्र घेऊन हजर झाला. हे पत्र मिळाल्यानंतर पंचायत समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांना हे संपूर्ण प्रकरण काही काळानंतर संशयास्पद असल्याचं आढळून आलं. त्यानंतर चौकशी केली असता हे पत्र बनावट असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांना पडताळणीत समोर आले. या घटनेने संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित पत्रात ग्रामसेवक पदाची जबाबदारी स्वीकारण्याची निर्देश ग्रामपंचायत विभागाने दिल्याचं नमूद असल्याचा समोर आल. या संपूर्ण प्रकरणानंतर तात्काळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पोलिसांना या तरुणाविरुद्ध चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश लेखी स्वरूपात दिले.

सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या

बनावट ग्रामसेवकाच्या नियुक्तीचे आदेशाचे पत्र घेऊन संबंधित तरुण पंचायत समितीत दाखल झाल्याने या प्रकरणाची संपूर्ण जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत विभागाने तात्काळ दखल घेतली. सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चौकशी आणि कायदेशीर कारवाईचे पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी देखील या संदर्भात अधिकचा तपास सुरू केला आहे. थेट ग्रामसेवक म्हणून जबाबदारी द्यावी असा आशय असलेले नियुक्तीपत्र अक्षय सूर्यकांत चौधरी यांना पोस्टाने आल्याच देखील प्राथमिक तपासात समोर आले आहे.यासंदर्भात बनावट नोकरीच्या अनुषंगाने आर्थिक व्यवहार करून एखादा रॅकेट सक्रीय असल्याचा देखील पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांकडून सुरू आहे.

नाशिक जिल्हा परिषदेतील बनावट ग्रामसेवक नियुक्ती पत्राच्या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेकडून सर्व नियुक्त या सरकारने ठरवून दिलेल्या अधिकृत प्रक्रिया आणि जाहिराती तसेच इतर पडताळणीच्या माध्यमातून केल्या जातात. मात्र, या संदर्भात संशयास्पद कागदपत्र आणि व्यक्ती आढळल्याने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनात या प्रकरणाने सरकारच्या नावाचा गैरवापर तसेच प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याने या गंभीर प्रकरणाची पोलिसांकडून आता चौकशी करण्यात आली आहे. मात्र, असेच प्रकरण इतर राज्यात कुठे सुरू आहे का किंवा या संदर्भात रॅकेट सक्रिय आहेत. कार्यासंदर्भात देखील चौकशीची मागणी केली जात आहे. बनावट नोकरी तसेच नोकरीचे अमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर येतात. मात्र थेट नियुक्तीपत्र घेऊन सरकारी कार्यालयात जाऊन आदेश मिळावा अशी घटना ही पहिलीच असावी आणि यासाठी प्रशासनाकडून आणि सरकारकडून तात्काळ सखोल चौकशी करावी अशी देखील मागणी शासकीय अधिकाऱ्यांकडून खाजगीत व्यक्त केली जात आहे.