Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगावात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरुन आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. मोसम पुलावर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. नाशिकमधील TCS प्रकरणावरुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. बजरंग दल, VHP, संघ व भाजप कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे. 

मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मालेगावात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.  शहरातील मोसम पुलावर कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. नाशिकमधील TCS कंपनीशी संबंधित प्रकरणावरून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रोत्साहन मिळू नये यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, संघ आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

नाशिकमधील टीसीएस प्रकरणावरुन मालेगावात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

नाशिकमधील टीसीएस प्रकरणावरुन मालेगावात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नाशिकमधील टीसीएस (TCS) बीपीओ सेंटरमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, जबरदस्तीने धर्मांतर आणि ब्लॅकमेलिंगचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात काही वरिष्ठ टीम लीडर्ससह अनेक जण संशयित असून, ९ हून अधिक एफआयआर (FIR) दाखल आहेत. याप्रकरणी एसआयटी (SIT) चौकशी सुरू असून, आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली आहे 

बीडमध्ये रखरखत्या उन्हात मुस्लिम समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर; मराठा समाजाचा पाठिंबा

आरक्षणाची मागणी करत बीडमध्ये रखरखत्या उन्हात मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. . बीडमध्ये निघालेल्या या मोर्चाला मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या मोर्चात सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी मराठा समाजाने नाष्टा आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. आज पर्यंत मराठा समाजाच्या निघालेल्या प्रत्येक मोर्चात मुस्लिम समाजाचे मोठे योगदान राहीलं आहे. त्यातून उतराई होण्याची हीच संधी असून मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळावे अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून या मागणीला पाठिंबा आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Nashik Crime News: नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराच्या रॅकेटचा SIT कडून तपास, निदा खान मात्र अद्याप बेपत्ता; नाशिकसह पुण्यात शोध सुरु