Nashik Kumbh Mela 2026: नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनावरून वाद अधिकअधिक चिघळतानादिसतोय. अशातच मातोरी, मुंगसरा येथे मोजणीदरम्यान तणाव निर्माणझालाआहे. यावेळी शेतकरी (Farmers)  आणि प्रशासनामध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचीदेखीलमाहितीआहे. यात पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाण झाल्याचानक आरोप स्थानिकांनीकेलाआहे. यात महिलांनाही मारहाण झाल्याचा ग्रामस्थांकडून दावा करण्यातआलाआहे. (Nashik Kumbh Mela 2026)

Continues below advertisement

Nashik News : मातोरी, मुंगसरा पेसा अंतर्ग ग्रामपंचायत ठराव नसल्याचा आरोप

दरम्यान, सिंहस्थ परिक्रमा मार्गासाठी 66.15 किमी रिंगरोड प्रकल्प प्रस्तावितआहे. हारिंगरोड 25 गावांमधून जाणार असून 365 हेक्टर जमीन यासाठी संपादन करण्यातआलीआहे. यातील 25 पैकी 19 गावांनी भूसंपादनास संमती दिली आहे. तर उर्वरित गावांचा मात्रयारिंगरोडप्रकल्पाला विरोध कायम आहे. अशातच मातोरी, मुंगसरा पेसा अंतर्ग ग्रामपंचायत ठराव नसल्याचा आरोप करत अनेकांची घरे प्रकल्पात जात असल्याने शेतकऱ्यांचा तीव्र विरोध दर्शवलाआहे.

Continues below advertisement

Nashik Kumbh Mela 2026: शेतकऱ्यांचे प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, शेतकरी जनआक्रोश आंदोलन केले जाणार

नाशिकमध्ये आगामी कुंभमेळा अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनावरून वाद चिघळला असून मातोरी, मुंगसरा येथे मोजणीदरम्यान झालेल्या तणाव वरून शेतकरी चांगलेच आक्रमक झालेआहे. पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाणीचा स्थानिकांचा आरोप आहे. आता प्रशासनाच्या विरोधात उद्या शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकरी जनआक्रोश आंदोलन केले जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्या रिंगरोड भूसंपादनाच्या जमीन मोजणीवरून शेतकरी आणि प्रशासनामधील वाद झाला होता. शेतकऱ्यांचा महिला शेतकऱ्यांवरही पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झालेआहेत. कुंभमेळा मंत्र्यावर देखीलयावेळी गंभीर आरोप करत उद्या शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जाणार आहे. प्रश्न मिटल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही क्रांतिवीर छावा संघटनेनंदिलाआहे.

कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही अन् तब्बल 70 कोटींचं कंत्राट मिळवलं, 

कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष यांच्या बनावट सहीने तब्बल 70 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुंभमेळा (Simhastha Kumbhmela) संदर्भात कामांची वर्क ऑर्डर मिळवण्यासाठी अज्ञाताने कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही वापरून गैरप्रकार (Nashik Crime News) केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा (Crime News दाखल करण्यात आला असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

इतरमहत्वाच्याबातम्या