Nashik Rain News: हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागाला मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) अक्षरशः झोडपून काढलं आहे. तर सध्या राज्यातील अनेक भागात पावसाने (Rain News) रौद्ररूप धारण केल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आज (1 ऑगस्ट) देखील राज्यात पावसाचा जोर कायम असून बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर तिकडे उत्तर महाराष्ट्रासह नाशकात (Nashik Rain News) पावसाने एकच हाहाकार केल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य धोका लक्ष्यात घेता जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता खबरदारी घेण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Nashik Heavy Rain)
 
Nashik Rain News: नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट, आज शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देत हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी आज मालेगाव, नांदगाव, बागलाण, इगतपुरी, कळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या तालुक्यांमध्ये उद्या भरणारे आठवडी बाजार, जत्रा, मेळावे आणि गर्दीचे सर्व कार्यक्रमही स्थगित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

Continues below advertisement

Nashik Rain : मोसम नदीला पूर, मुल्हेर येथील पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल मध्यरात्रीपासून हरणबारी धरण परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मोसम नदीला पूर आला असून मुल्हेर येथील मोसम नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे मांगीतुंगी, माळीवाडे, शेवरे, देवठाण, जैतापूरसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच गुजरातला जोडणाऱ्या मुल्हेर–हरणबारी मार्गावरील नाल्यावर पाणी आल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

Continues below advertisement
Nashik Heavy Rain : चांदवडच्या राजदेरवाडी इंद्राईवाडीचे धबधबे प्रवाहित, डोंगरांनी परिधान केला हिरवा शालू..

नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निसर्गाचे भरभरून दान लाभलेल्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी व इंद्राईवाडी डोंगर रांगावरील सर्व धबधबे प्रवाहित झाले.. तर नदी व नाले दुथडी वाहताहेत..छोट्या मोठ्या धरणावरून पाणी ओसंडून वाहू लागले असून डोंगरांनी हिरवा शालू परिधान केल्याने निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून गेले आहे. ढग अक्षरक्ष : डोंगरावर उतरून येत असल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे.