Nashik : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कोठरे शिवारात धक्कादायक घटना घडली आहे. सावकाराच्या गुंडांकडून लोखंडी टामीने शेतकऱ्याला (Farmers) जबर मारहाण करण्यात आली आहे. 20 लाखांच्या सावकाराच्या कर्जापोटी शेतकऱ्याने 71 लाख रुपये फेडले आहेत. तरीदेखील जमीन हडपण्यासाठी सावकाराने गुंड पाठवले होते. याच गुंडांनी शेतकऱ्याला मारहाण केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
10 वर्षापूर्वी एका सावकाराकडून घेतलं होतं 20 लाखांचे कर्ज
बापू भिका पवार यांचे शेत असून त्यांनी 10 वर्षापूर्वी एका सावकाराकडून 20 लाखांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी त्यांची शेती सदर सावकाराकडे गहाण ठेवली होती. मात्र, त्या 20 लाखांचे शेतकऱ्याने 71 लाखांची परतफेड केल्याचा दावा केला आहे. तरी सुद्धा सावकाराने त्या शेतकऱ्याची जमीन परस्पर हडप करुन काल त्या शेतीवर ताबा घेण्यासाठी गुंड पाठवले होते. जमिनीचा ताबा घ्यायला येणाऱ्या गुंडांकडून बापू पवार या शेतकऱ्याला त्याचा मुलगा मनोज पवार, पत्नी निर्मला पवार यांना लोखंडी टामीने बेदम मारहाण केली. केल्याने बापू पवार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
माझ्या जीवाचे रान करुन सावकराला 71 लाख रुपये दिले
आमच्या वडिलांनी 10 वर्षापूर्वी सावकराकडून कर्ज घेतले होते. याबदल्यात त्यांना जमिनीची खरेदी दिली होती. खरेदी घेतल्यानंतर सावकाराने आंमची फसवणूक केल्याचा आरोप मनोज पवार यांनी केला आहे. आता ते सावकर आमच्या जमिनीचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. पोलिसांना देखील या सगळ्या गोष्टी माहित असल्याचे मनोज पवार म्हणाले. पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. काल सावकाराने 8 ते 10 गावगुंड पाठवले होते. त्यांनी आम्हाला मारहाण केल्याची माहिती मनोज पवार यांनी दिली. आमचा कांदा लागन चालू होती, त्यावेळी गुंडांनी आम्हाला मारहाण केली., त्यांच्याकडे, सळई, रॉड, फावडे होते. त्याने आम्हाला मारहाण केली. वडिलांना खूप लागले आहेत. वडिलांनी सावकराकडून 20 लाख घेतले होते. मी माझ्या जीवाचे रान करुन सावकराला 71 लाख रुपये दिल्याची माहिती मनोज पवार यांनी दिली आहे. तरीसुद्धा जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे मनोज पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: