समृद्धी महामार्ग मोजणीला हिंसक वळण
एबीपी माझा वेब टीम | 07 Apr 2017 04:15 PM (IST)
नाशिक: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग मोजणीला हिंसक वळण लागलं आहे. नाशिकजवळच्या शिवडे इथं शेतकऱ्यांनी जमीन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. इतकंच नाही तर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जाळपोळही केली. शेतकऱ्यांच्या या पवित्र्यामुळे वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा विरोध डावलून मोजणी सुरु केल्याने त्यांनी रोष व्यक्त केला.. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारनं भूमीसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. VIDEO: target="_blank">स्पेशल रिपोर्ट: मुंबई- नागपूर हायवेचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट