Nashik Crime News  :  कर्नाटकातील 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणीमहत्वाची अपडेट समोर आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांना शरण आलेल्या किशोर सावळा याला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गोव्यातून कर्नाटक राज्यात 400 कोटी रुपयांच्या 2 हजार रुपयांच्या नोटा घेऊन जातना चोरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. कंटेनर चोरी केल्याच्या संशयवरुन अपहरण केल्याचा आरोप नाशिकच्या संदिप पाटील याने केला होता. संदिप पाटील यांच्या अपहरण प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. 

आरोपीला न्यायालयाने 3 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

6 जणांना अटक करणाऱ्या नाशिक ग्रामीण पोलिसांना सातवा आरोपी अटक करण्यात अपयश आलं मात्र संशयित स्वतःहून शरण आला आहे. सातवा आरोपी ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक  किशोर सावळा याला इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने 3 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक पोलीस केवळ अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करत आहेत. किशोर सावळाच्या चौकशीत काय समोर येते याकडे लक्ष लागलं आहे. 400 कोटी रुपयांच्या नोटांची खरंच चोरी झाली होती की बनाव होता याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. 

राज्यात महापालिका निवडणुकांचा धुरळा अजून खाली बसलेला नसतानाच नाशिकमधून (Nashik) एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत तब्बल 400 कोटी रुपयांच्या कंटेनर लुटीचा मोठा कट उघडकीस आला असून, या प्रकरणात राजकीय आणि बिल्डर लॉबीचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आलाय. या गंभीर प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नाशिकमधील एका तरुणाच्या अपहरणाच्या तपासातून हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये संदीप पाटील (Sandeep Patil) या तरुणाचं अपहरण झालं होतं. या प्रकरणाच्या तपासादरम्यान कर्नाटकमधील चोरला घाटात 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या कंटेनर लुटीचा मोठा खुलासा झाला. गोव्याहून कर्नाटकमार्गे एका ट्रस्टकडे जाणाऱ्या दोन कंटेनरमध्ये तब्बल 400 कोटी रुपये होते. हे पैसे 2000 रुपयांच्या जुन्या नोटांमध्ये असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे (मुंबई) यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nashik Crime News: 400 कोटी रुपयांनी भरलेले दोन कंटेनर कसे लुटले? नाशिकमधील तरुणाने सांगितला संपूर्ण थरार; म्हणाला...