नाशिकमध्ये 25 वर्षीय शेतकऱ्याची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 17 Apr 2017 10:29 AM (IST)
प्रातिनिधीक फोटो
मनमाड : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वाके गावात ही घटना घडली. मनोज शांताराम सावंत असं 25 वर्षीय शेतकऱ्यांचं नाव आहे. शेततळ्याच्या पाण्यात उडी घेऊन मनोज सावंत यांनी आत्महत्या केली. सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर याला कंटाळून या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरुच असल्याचं चित्र आहे.