मुंबई: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये थेट पोलीस अधिकाऱ्यांचाच सहभाग असल्याचा संशय सीबीआयला आहे. याप्रकरणी सबीआय दोन निवृत्त पोलीस अधिकारी आणि सेवेत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करत आहे.

 

यामध्ये निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम यांचाही समावेश आहे. रमाबाई आंबेडकर नगरमधील दंगलीत कदम यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर कोर्टानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पण हायकोर्टानं त्यांना जामीन दिला. त्यानंतर त्यांनी सनातनच्या साधकांना प्रशिक्षण दिल्याचा संशय आहे.

 

यात फरार आरोपी सारंग अकोलकर, रुद्र पाटील, विनय पवार आणि प्रवीण निमकर यांना प्रशिक्षण मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.

 

एवढंच नाही तर दाभलोकरांच्या हत्येसाठी वापरलेली रिव्हॉल्वर बनविण्यात पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा संशय आहे.

 

विशेष म्हणजे सध्या सेवेत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सनातनवर काय कारवाई सुरु आहे, याची माहिती सनातनला दिल्याचा आरोपही सीबीआयनं केला आहे.

 

… तर डॉ. नरेंद्र दाभोलकर वाचले असते

 

20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या झाली होती. मॉर्निंग वॉकला गेले असताना ओमकारेश्वर पुलाजवळ दोघा अज्ञात व्यक्तींनी त्यांची हत्या केली.

 

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातल्या दोन हल्लेखोरांपैकी सारंग अकोलकर यानेच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. तर सध्या अटकेत असलेला डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावाही सीबीआयनं केला आहे.

संबंधित बातम्या :


डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा छडा लागला?


कोण आहेत सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे?


तावडे-आकोलकरला शस्त्रांचा कारखाना सुरु करायचा होता : सीबीआय


डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पहिली अटक


पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याचा दाभोलकर हत्येशी संबंध?


'सनातन' ही दहशतवादी संघटना, हिंदू समाजावर काळा डाग : आशिष खेतान