Nandurbar Maratha agitation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील उमर्दे इथं घडली आहे. गुलाब मराठे असं आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या आंदोलकाचं नाव आहे. गेल्या दीड वर्षापासून मनोज जारांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी लढा देत आहेत. त्यासोबतच नंदुरबार येथील आंदोलक गुलाब मराठे देखील जरांगे यांना समर्थन देत आहेत.
आत्मदहन करणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील आंदोलक आक्रमक झाले आहेत. या आंदोलकांनी शासनाचा निषेध करत आत्मदहन करण्याच्या प्रयत्न केला आहे. आत्मदहन करणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शासनाने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा नंदुरबार जिल्ह्यातील आणखीन तीव्र आंदोलन होणार असल्याचा इशारा आंदोलक गुलाब मराठे यांनी दिला आहे.
आपली आरक्षणाची लढाई आपल्याला पूर्ण जिंकायचीय : मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे काही दिवसांपूर्वीच आरक्षणाच्या मागणीसाठी (Resrevation Demand) उपोषणाला बसले होते. गेल्या काही महिन्यांपासून जरांगे हे मराठी समाजाच्या आरक्षणासाठी लढा देताना दिसत आहेत. सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (OBC Reservation) देण्याची त्यांची मागणी आहे. अनेक दिवस त्यांनी उपोषण केले. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे म्हटले होते. अनेकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका करतानाही जरांगे दिसले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आक्रमक भूमिका जरांगेंनी घेतली. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोपही केली. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या मागे आपण उभे असल्याचे त्यांनी म्हटले. आता नुकताच जरांगे यांनी मराठा समाजाला मोठे आवाहन केले आहे. मनोज जरांगे पाटील हे धाराशिव जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी लातूरमधील मुरूडमध्ये धावती भेट घेतली. आपली आरक्षणाची लढाई आपल्याला पूर्ण जिंकायची आहे. मी जे काम हातात घेतो ते काम कधीच मी अर्धवट सोडत नाही. कायम एकजूट राहायचं आणि व्यसनापासून दूर राहा. आता ही आरक्षणाची लढाई थोडीशी शिल्लक आहे. त्यामुळे पुढच्या काळात ही मराठा समाजाने एकजूट राहा. राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला पूर्ण आरक्षण मिळाल्याशिवाय आपण कोणीही मागे हटू नका. आपली लढाई ताकतीने लढायची आहे.
महत्वाच्या बातम्या:
मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मराठा बांधवांना पुढील महिन्याभराचा प्लॅन सांगितला; आता प्रत्येक गावात...