Nandurbar Culling Operation : नंदुरबारच्या नवापूर (Navapur) परिसरात बर्ड फ्ल्यूचा (Nandurbar Bird Flu) उद्रेक झाल्याचेचित्रआहे. बर्ड फ्ल्यूच्या प्रादुर्भाव लक्षातघेताशहरातभीतीचंवातावरणनिर्माणझालंअसून प्रशासनाच्यावतीने मोठे कलिंग ऑपरेशन (Culling Operation) सुरू आहे. ज्यामध्ये दोन दिवसांत तब्बल 44 हजार कोंबड्यांचे कलिंग करण्यातआलेआहे, तर 20 हजार अंडी नष्ट करण्यातआलेआहे. यासोबतच 44 टन पशुखाद्यही प्रशासनाकडून (Bird Flu) नष्ट करण्यातआल्याचीमाहितीआहे. दरम्यान, या परिसरातीलनागरिकांनाप्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यातआलाआहे. परिणामी पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माणझालंअसूनयासंदर्भातकाळजीघेण्याच्यासूचनाहीप्रशासनाकडूनदेण्यातआल्याआहेत.
Nandurbar Bird Flu: पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण, नवापुरात चिकन, बिर्याणी सेंटर आणि अंडे विक्रीवर बंदी
नवापूर शहरात तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, बाधित क्षेत्रातील एक किलोमीटर परिघातील पक्षी आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नवापूर नगरपरिषदेने शहरात चिकन, अंडी आणि बिर्याणी विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. मुख्याधिकारी मयूर पाटील यांनी स्पष्ट केले की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, या अचानक लागलेल्या बंदीमुळे स्थानिक लहान व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने नागरिकांना न घाबरता सरकारी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Navapur Bird Flu : नवापूर शहरात तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा शिरकाव, 1.40 लाख पक्ष्यांची विल्हेवाट
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामधील तीन कुक्कुटपालन केंद्रांमध्ये (पोल्ट्री फार्म्समध्ये) या संसर्गाचा प्रसार झाला आहे. या जिल्ह्यात यापूर्वी 2006 आणि 2021 मध्येही बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याची नोंद झाली होती. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी, बाधित तीन कुक्कुटपालन केंद्रांमधील तसेच या बाधित केंद्रांच्या एक किलोमीटरच्या परिघातील अन्य तीन केंद्रांमधील, अशा सुमारे 1.40 लाख पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याचे (culling) आदेश जारी केले आहेत. "आम्ही एक पथक गठीत केले आहे, हे पथक आवश्यक ती कामे पार पाडण्यासाठी त्या तालुक्यातील सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधेल. बाधित क्षेत्राच्या 5 किलोमीटरच्या परिघातील पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळा चाचण्यांसाठी पाठवले जातील' असे सेठी यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
